Categories
रिंगणनाट्य

चौथी खिडकी उघडताना…

वार्षिकांक – २०१४

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘विज्ञान-निर्भयता-नीती’ असे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात गेल्या 25वर्षांपासून समाजबदलाचे विविध विधायक प्रयोग करणारी संघटना. या बहुतांशी प्रयोगाचे मुख्य निर्माते होते शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर. डॉक्टरांच्या नंतर असे प्रयोग करणे आणि ते यशस्वी करणे हे आव्हान आता कार्यकर्त्यांनी पेललेले आहे. अंनिसचा ‘रिगंणनाटक’ हा असाच एक प्रयोग. ज्यांनी प्रत्यक्षात या नाटकात काम केले त्या अंनिसच्या शिलेदारांचा […]

Categories
रिंगणनाट्य

‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’

वार्षिकांक – २०१४

दि.20 ऑगस्ट 2013 रोजी विज्ञाननिष्ठ समाजसुधारक, विवेकवादी चळवळीतील द्रष्टे नेतृत्व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात खून झाला. खुनाच्या पश्चात तरूणाई ज्या प्रमाणात रस्त्यावर उतरली त्यावरून डॉक्टरांच्या कामाचा पसारा आणि लोकप्रियता लक्षात येईल. डॉक्टरांच्या अशा जाण्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरूणाईने डॉक्टरांचा विवेकवादाचा, अहिंसेचा मार्ग जपत शांततेच्या व लोकशाही मार्गाने पूर्ण 1 वर्ष वेगवेगळी आंदोलने करून आपला निषेध व्यक्त […]

Categories
रिंगणनाट्य

आंतरजातीय विवाहातील अडथळे

वार्षिकांक – २०१४

जून : लातूर शाखेची, अंनिसची नियमित बैठक, रूटीन वर्क झाल्यावर बावगे सरांनी ‘रिंगण नाट्य’ व त्याची सोलापूर येथील कार्यशाळा याची माहिती दिली व नोंदणीसाठी नाव द्या असं सांगितलं. मी शांतच होते. आकनगिरे मॅडम म्हणाल्या, ‘आपण दोघी नाव देऊ या’ पण युवा वर्गासाठी हे सारं आपण काय करायचं? त्यावर बावगे सर म्हणाले, ‘प्रत्येकाला स्टेजवरच संधी मिळेल […]

Categories
रिंगणनाट्य

भोंदू ‘अस्लम बाबा’चे ऑपरेशन

वार्षिकांक – २०१४

20 ऑगस्ट 2013 ला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला, अजून खुनी सापडत नाहीत. मारेकर्‍यांचा निषेध वेगवेगळ्या पातळीवर चालू आहे. त्याला एक वैचारिक-साहित्यिक पातळीवर निषेध व्यक्त करण्यासाठी रिंगणनाट्य हा देखील दखल घेणारा पर्याय असू शकतो. रिंगण नाटकाच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी सक्षम ताकदीने वैचारिक बाजू असणारे अनेक घटक निर्माण झाले पाहिजेत. […]

Categories
रिंगणनाट्य

उघडली चौथी खिडकी

वार्षिकांक – २०१४

कोल्हापूरला रिंगणनाट्य प्रशिक्षणाची कार्यशाळा घेण्याचे निश्चित झाले आणि मग सर्वजण आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागलो. कार्यशाळा 20 ते 22 जून अशी तीन दिवसांची होती मात्र आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडचे सर्व साथी 19 तारखेलाच मुक्कामी जाणार होतो. त्यासाठी पाच वाजता स्वारगेटला सर्वजण जमा झालो आणि त्यानंतर सुरु झाला आयुष्यातील सर्वात कंटाळवाणा प्रवास. गाडी चालवणार्‍यांचा […]

Categories
रिंगणनाट्य

भयमुक्त चित्त जेथे

वार्षिकांक – २०१४

‘भयमुक्त चित्त जेथे’‘सारे सोबत लढू, धडपडूआनंदाची दारे उघडू, उघडू खिडक्या आता मनाच्यानव्या विचारालाआम्ही सारे सोबतीमग भीती कशाला?’ असं गाणं गुणगुणत समाज पिंजून काढणारा एक कार्यकर्त्यांचा गट नाटकाच्या सुरवातीला प्रेक्षकांमधूनच निश्चयाने, त्वेषाने रंगमंचावर दाखल होतो. एक संवाद सुरू होतो. खरंच आपलं उद्दिष्ट काय? आपल्याला कुठं जायचं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा इथं प्रयत्न आहे. शंभर वर्षांपूर्वी […]

Categories
रिंगणनाट्य

डाकीणप्रथा निर्मूलनास कायद्याचं बळ

वार्षिकांक – २०१४

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर खुनाचा निषेध म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे सरांच्या विचारांचे अविष्कार म्हणजे रिंगणनाट्य. आजपर्यंत आम्ही पथनाट्य, सडकनाट्य ऐकली होती; परंतु रिंगणनाट्य काय भानगड ही कळायला मार्ग नव्हता. आणि त्याचा विषय अंधश्रद्धा निर्मूलन, जात धर्म, स्त्रियांचे शोषण, भोंदूची फसवेगिरी, ज्योतिष्यांची राशीभविष्याचं गौडबंगाल आणि अजून खूप काही. अंधश्रद्धेचा आवाका खूप मोठा आणि समाजात या अंधश्रद्धेची […]

Categories
रिंगणनाट्य

मतिमंद मुलगी व शोषण

वार्षिकांक – २०१४

“मॅडम, गाणी आपणच लिहायची, रिंगणनाट्याची संहिताही आपणच तयार करायची, मग इथे शिबिरात काय शिकवणार?” शिबिराच्या पहिल्या दिवशी सहभागी मुलांमुलींच्या या प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्यावं हे आम्हाला सुचेना. अतुल पेठेंची भन्नाट कल्पकता आणि कार्यक्षमता याविषयी आम्ही ऐकून होतो. पण लेखनातील अनुभवी किंवा फार तर किरकोळ स्फुट लेखन करणार्‍या आम्हा मंडळींकडून जाहीर सादरीकरण करण्याजोगी निर्मिती ते […]

Categories
रिंगणनाट्य

मुक्तीची गाथा…

वार्षिकांक – २०१४

‘परिवर्तन’नावाचा केंद्रबिंदू घेऊन समाजाच्या वर्तुळावर उभे असणार्‍या माझ्या मित्रांनो, तुम्हाला क्रांतीकारी सलाम. आज सूर्य होणं अगदी गरजेचं आहे. नि स्वयंप्रकाशित तर झालाच पाहिजे हे माझं स्पष्ट मत. मात्र सूर्य होताना मला वाटतंय की, समाजाचा विचार करून प्रथमत: सूर्यकिरण होणं ही तितकंच महत्वाचं. नि अशीच काही विवेकी किरणं एकत्र येऊन नव्या परिवर्तनीय सूर्याची वाट पाहतायेत ‘रिंगणनाट्य’ […]

Categories
रिंगणनाट्य

लोकरंगमंच रिंगणनाट्य सादरीकरण

जुलै - २०१४

विवेकी जीवनशैली अंगीकारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या संघटीत कार्याचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद झाले त्याला येत्या 20 ऑगस्ट 2014 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटीत कार्याला येत्या 9 ऑगस्ट 2014 रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोनही महत्वपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचा-वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार सांस्कृतिक माध्यमातून महाराष्ट्राच्या जनमानसात […]