अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘विज्ञान-निर्भयता-नीती’ असे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात गेल्या 25वर्षांपासून समाजबदलाचे विविध विधायक प्रयोग करणारी संघटना. या बहुतांशी प्रयोगाचे मुख्य निर्माते होते शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर. डॉक्टरांच्या नंतर असे प्रयोग करणे आणि ते यशस्वी करणे हे आव्हान आता कार्यकर्त्यांनी पेललेले आहे. अंनिसचा ‘रिगंणनाटक’ हा असाच एक प्रयोग.
ज्यांनी प्रत्यक्षात या नाटकात काम केले त्या अंनिसच्या शिलेदारांचा अनुभव शब्दबद्ध करणे आवश्यक वाटत होते. म्हणून वार्तापत्राच्या वतीने सर्व गटांना याबाबत काही मुद्द्यांच्या आधारे लेख पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. काहींनी लेख पाठवले. काहींनी कामाच्या व्यापामुळे दिलगिरी व्यक्त केली. तर काहींना मुळात लिहिणेच अवघड जात होते. या सर्वांवर मात करीत काही गटांचे प्रतिनिधिक लेख घेतले आहेत.
रिंगणनाटकात काम करणारे बहुतांशी कार्यकर्ते आहेत, ते व्यावसायिक कलाकार नाहीत. तसेच लिहिणारे हे लेखक नाहीत. म्हणून त्यांच्या लेखनात त्रुटी शक्य आहेत; परंतु ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अवघड लढाईबाबत बांधिलकी मानणारे शिलेदार म्हणून कौतुकास पात्र आहेत. तर मग या रिंगणनाटकातील प्रकाशबीजांचा समृद्ध अनुभव त्यांच्याच शब्दात.
अंनिस लोकरंगमंच महाराष्ट्रातील गटाने सादर केलेली रिंगणनाट्ये
1. शिरगाव (जि.सिंधुदूर्ग) गट- भयमुक्त चित्त जेथे
2. तासगाव-आटपाडी गट – बुवाबाजी आणि हितसंबंध
3. पिंपरी चिंचवड गट – बोटाने शस्त्रक्रिया-बुवाबाजी
4. मोहोळ गट -ज्योतिषी, भविष्य आणि अंधश्रद्धा
5. जळगाव गट (अ)-बुवाबाजी भांडाफोड
6. पुणे गट – शहरातली अंधश्रद्धा
7. सोलापूर गट(ब)-आधुनिक जगातील अंधश्रद्धा
8. जळगाव गट (ब)- माध्यमे आणि अंधश्रद्धा
9. भुसावळ, फैजपूर गट – आंतरजातीय विवाह
10. मुरूड (जि.लातूर) गट – आंतरजातीय विवाह
11.कोल्हापूर गट(अ)- आंतरधर्मीय विवाह आणि अंधश्रद्धा
12. शहादा, तळोदा गट – डाकीण निर्मूलन
13. सोलापूर गट (ब) – मतीमंद मुलगी आणि शोषण
14. चाळीसगाव गट – मानसमित्राचे महत्व
15. जळगाव (क) – समाज सुधारकाचा खून
16. इस्लामपूर गट- सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम
17. सातारा गट – जादूटोणा कायदा आणि कलमे