– संजय सावरकर प्रतिक : जगबुडीतून सहीसलामत वाचल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो. शरयू : हो जसे काही खरोखरच जगबुडी येणार होती. ज्योती : येणार होतीच! पण काही तांत्रिक बिघाडामुळे ती पुढे ढकलली आहे. प्रतिक : तशी ती माझ्या आजोबांच्या काळापासून पुढे ढकलली जातेय. कल्पेश : आता तुमची टकळी अशीच चालू राहणार की, आपण ज्याच्यासाठी जमलो […]
कॅटेगरी: चार्वाक कट्टा
देव मानणारी गुणसूत्रे?
शरयू : जवळजवळ तीन वर्षे झाली पण आपण कधीही देव या विषयावर चर्चा केली नाही, हे खरे वाटत नाही. ज्योती : करायची गरज होती असेही वाटत नाही. आजपर्यंत मी देव या कल्पनेपासून जितकी दूर गेली त्याचे कारण आपण या विषयाची चर्चा केली नाही हेच असायला पाहिजे. शरयू : ज्योती, तू झोपेत तर बोलत नाहीस ना! […]
व्यंग आणि चित्रे
ज्योती : तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? ते व्यंगचित्र पुस्तकात तसंच राहू द्यावे की काढून टाकावे? मला हो किंवा नाही हे उत्तर हवे. उगाच निरर्थक चर्चा नको. आशिष : चर्चा न करताच निर्णय घेणे, मला पटत नाही. कारण अशा पद्धतीने निर्णय घ्यायचे झालेत तर संसद बंद करावी लागेल. आणि जो कुणी निवडून येईल त्याला पाच वर्षांसाठी […]
बुरख्याआडचे चेहरे
शरयू : अरे मागच्या महिन्यात भेटलो असतो तर एका गरमागरम बातमीवर चर्चा करता आली असती. समीर : विषय जर गॉसिप या सदरात मोडणार नसेल तर आताही बोलू शकतो. शरयू : एका ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्या नेत्याच्या नातीने मुस्लीम तरूणाशी लग्न केले याला तू काय म्हणशील? ज्योती : मला एक कळत नाही की, आजोबाने काय म्हणावे […]
मी अण्णा हजारे!
आशिष : आपल्या लोकांची एक गंमतच आहे. दोन परस्परविरोधी कृती अगदी मनापासून करत असतात. एका बाजूला अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मोर्चा काढायला पण जमतात. आणि दुसर्या बाजूला नवस फेडायला लालबागच्या राजाच्या दर्शनाला पण लाखोच्या संख्येने गर्दी करतात. शरयू : मला वाटतं आशिष, गणेशोत्सवाच्या काळात तुझी झोप पुरेशी झाली नसावी. नाहीतर नवसाचा आणि अण्णाच्या आंदोलनाचा संबंध काय? […]
रक्षाबंधन की सिस्टर्स डे
प्रतिक : या वेळेला आपण आशिषचं अभिनंदन करायला हवं. समीर : त्याला काही बक्षीस वगैरे मिळालं की काय? प्रतिक : त्याहीपेक्षा महत्वाचं असं त्याने केलंय. यावेळी रक्षाबंधनच्या वेळेस बहिणीकडून ओवाळून न घेण्याचं त्याने ठरवलं आणि ते अंमलात आणलं देखील. ज्योती : पण यात काही अभिनंदन करण्यासारखं नाही. कधी कधी तुमचा तर्क तुम्ही फार टोकाला नेता. […]
ज्योती : प्रतिक, यावेळेस तू जरा खूष झाला असशील ना! एकदम विरोधी असलेल्या दोन राजकीय नेत्यांनी अगदी हवी तशी प्रतिक्रिया दिली. समीर : प्रतिक्रिया दिली की कबुली जबाब दिला? ज्योती : म्हणजे? मला कळलं नाही. समीर : “बुवा-बाबा झालो असतो तर बरं झालं असतं!” हा कबुली जबाब म्हणायला हवा. ज्योती : तू पण हद्दच करतो. प्रतिकसारखं […]
रामदेवबाबा, सरकार आणि आपण
शरयू : जवळ जवळ दोन महिन्यांनी भेटतो आहोत आपण, नाही का! कल्पेश : आणि नेमक्या या दोन महिन्यातच इतक्या घडामोडी घडल्या की, असं सारखं वाटत होतं की आपण भेटायला पाहिजे. सत्यसाईबाबा, रामदेवबाबाचं उपोषण, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि सगळ्यांवर कडी म्हणजे शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग. कितीतरी विषय निसटले हातून. ज्योती : वर्ल्डकप विसरलास वाटतं! शरयू : मला […]
दयामरण आणि इच्छामरण
ज्योती : कोणत्याही विषयाला सुरूवात करण्यापूर्वी मला सर्वांचे मत ऐकायचे आहे. “अरूणा शानबाग”च्या बाबतीत न्यायालयाने जो निर्णय दिला त्याबद्दल आपण चर्चा करू या? शरयू : मला वाटतं, या विषयावर चर्चा करण्याइतपत आपला अभ्यास नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चर्चा करणे चुकीचे ठरेल. समीर : मला शरयूचे म्हणणे पटत नाही. नाहीतर प्रत्येक विषय असाच सोडून द्यावा लागेल. […]
पर्यावरणपूरक गणेशविसर्जन
शरयू : विवेकवाहिनीच्या “विवेकी” सभासदांनी न्यायालयाचा निर्णय वाचलेला असेलच. कल्पेश : विवेक वाहिनीचे सर्वच सभासद ‘विवेकी’ आहेत, असं तर तुला म्हणायचं नाही ना? स्मिता : आणि विवेकी असणं म्हणजे नेमकं काय? हे तरी कोण ठरवणार? समीर : हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होईल हे खरंय, पण त्याची चर्चा करण्याअगोदर शरयूला काय म्हणायचं ते तर समजून […]