Categories
शाखा वार्ता सत्यशोधक विवाह

वर्धा अंनिसने लावला सत्यशोधक विवाह

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धातर्फे सेवाग्राम येथे दि 26 मे रोजी 32 वा आंतरधर्मीय विवाह संपन्न झाला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सचिन ओंबासे सर (सी.ई.ओ. जि. प. वर्धा) मा. विकास राचेलवार (सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), मा. गजेंद्र सुरकार(राज्य सरचिटणीस), मा. प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला प्रबोधिनी) उपस्थित होत्या. महात्मा […]

Categories
सत्यशोधक विवाह

गोराणे आणि कर्णावर यांचा सत्यशोधकी बचत विवाह संपन्न!

मार्च - २०१९

महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांची सुकन्या डॉ. आसावरी आणि तेर, ता. जि. उस्मानाबाद येथील शेतकरी भारत कर्णावर यांचे सुपुत्र चि. रमेश यांचा नुकताच तेर या गावी अनावश्यक खर्च व अनेक निरर्थक कर्मकांडे टाळून अतिशय साध्या पद्धतीने सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. विवाहासाठी जाणीवपूर्वक मोजके कार्यकर्ते, आप्तस्वकीय, मित्रमंडळींना आमंत्रित केले होते; शिवाय उच्चशिक्षित नवदांपत्य […]

Categories
कव्हर स्टोरी सत्यशोधक विवाह

आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांचा राज्यस्तरीय मेळावा!

फेब्रुवारी - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशक वर्षपूर्तीनिमित्त आणि मिश्रविवाह व महिला सहभाग विभागाच्या वतीने लातूर येथे 12 जानेवारी रोजी आंतरजातीय-आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहितांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्थातच 3 ते 12 जानेवारी या दरम्यान राज्यात झालेल्या महिला सबलीकरण प्रबोधन अभियानाचा हा समारोप समारंभ होता. समितीचा मिश्रविवाह विभागही अतिशय प्रभावी व दखलपात्र असाच आहे. विचार व […]

Categories
सत्यशोधक विवाह

सातार्‍यात सत्यशोधक विवाहात पुस्तकांचा आहेर

ऑक्टोबर - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समितीचे संस्थापक शंकर कणसे यांचे सुपुत्र किरण कणसे आणि अंकिता पवार यांचा विवाह महात्मा फुले यांनी रूढ केलेल्या सत्यशोधक पद्धतीने दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस माननीय डॉ. हमीद दाभोलकर व शैला दाभोलकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा […]

Categories
सत्यशोधक विवाह

सत्यशोधक पद्धतीने विवाह

जून – २०१४

जळगाव येथील आशाबाबा नगरात कुर्‍हे पानाचे, ता.भुसावळ, जि.जळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते संजय बारी याचा पुतण्या चि.योगेश याचा विवाह पुरोगामी विचारांचे शांताराम बारी यांची कन्या दिपाली हिच्याशी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. सुरवातीला प्रबोधनकार व किर्तनकार प्रा. संतोष चौधरी, परतुर(जि.जालना) यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सुधाकर बडगुजर व प्रकाश बारी यांच्या […]

Categories
सत्यशोधक विवाह

शिराळा तालुक्यात पहिला सत्यशोधकी विवाह

फेब्रुवारी – २०१४

करमाळे(ता.शिराळा, जि.सांगली) येथील समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने पत्रकार अमर लक्ष्मण पाटील यांचा दानोळी, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर येथील शुभांगी शिंदे हिच्याशी सत्यशोधक विवाह घडवून आणला. शिराळा तालुक्यातील हा पहिला सत्यशोधक विवाह आहे. ईर्षा, श्रीमंतीचे प्रदर्शन, बँड, ढोल, ताशे, डॉल्बी, घोडा यामुळे विवाहात खर्चही मोठा होई. प्रचंड खर्च आणि कर्ज व्याज, सावकारी […]

Categories
सत्यशोधक विवाह

सत्यशोधकी/नोंदणी विवाहांचे प्रस्थ वाढते आहे

जानेवारी - २०१२

धार्मिक विधींना फाटा देत आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी आकाश चौगुले आणि गौरी ओऊळकर यांचा विवाह बेळगांव येथील गांधी भवनात झाला.आकाश हा अंनिस कार्यकर्ते शंकर चौगुले (रा. बेळगुंदी) यांचा पुत्र व गौरी ही सुभाष फोटोज्चे संचालक सुभाष ओऊळकर यांची कन्या आहे. वधू-वरांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी वैवाहिक जीवनाची शपथ दिली. या […]

Categories
सत्यशोधक विवाह

नितीन व संपदाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न

सप्टेंबर - २०११

आयटक कामगार केंद्र, बिंदू चौक, कोल्हापूर कार्यालयामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्रामार्फत नितीन शंकर साळवी रा.बांदिवडे, ता.पन्हाळा व संपदा केरबा माळवी, रा.मुंबई(अंधेरी) यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावणेत आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर व अंनिसचे राज्य सचिव शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली लावणेत आला.             दोघांनी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत आयुष्यभर […]

Categories
सत्यशोधक विवाह

लातूर येथे सत्यशोधकी विवाह

ऑगस्ट - २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लातूरच्या वतीने दि.9/6/2011 रोजी हॉटेल अंजनी, शिवाजी चौक, लातूर येथे सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. हा विवाह लातूर शाखेचा 75 वा सत्यशोधकी विवाह. वर-एकुरगे बजरंग भिमराव, वधू-राखेवार मंगल विठ्ठलराव होते.  सत्यशोधकी आंतरजातीय विवाहाचे प्रास्ताविक व भूमिका माधव बावगे यांनी करून दिली. वधुला शपथ प्रा.श्याम आगळे सरांनी तर वराला शपथ प्राचार्य शिवाजीराव […]

Categories
सत्यशोधक विवाह

प्रा. काशिलिंग गावडे यांचा सत्यशोधक विवाह

जून – २०११

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा तालुक्याचे अध्यक्ष महाराष्ट्र विवेकवाहिनी जिल्हा सांगलीचे कार्याध्यक्ष प्रा.काशिलिंग गावडे यांचा म.ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह पलूस येथे संपन्न झाला. म.ज्योतिराव फुले यांनी प्रचलित केलेला आणि सत्यशोधकांनी, पुरोगामी विचाराच्या युवकांनी, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवलेला ‘सत्यशोधक विवाह’ हा पलूस, कुंडल परिसरात कुतुहलाचा आणि विचारास चालना देणारा ठरला.             प्रा.काशीलिंग गावडे आणि […]