Categories
कविता

मासिक आणि मानसिक पाळी

वार्षिकांक - २०१९

“दीदीला पदर आला,”

असं आई बाबांना म्हणाली

दीदीने बाबांकडे पाहिलं,

बाबांनी दिदीकडे पाहिलं

दीदीची निरागसता

अगदी तशीच…

पण बाबांच्या चेहर्‍यावर काळजी.

कायम उघडी असणारी

घराची एक खिडकी

बाबांनी आज कायमची बंद केली

दीदीला कळलंच नाही

तिच्या मनात एकच प्रश्न

खि.ड.की. बंद का…?