अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. अशा वेळी हे काम करणार्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळणे, त्यांचा आधार मिळणे खूप गरजेचे असते. कुटुंबातूनच प्रत्येक वेळी विरोध झाला तर कार्यकर्त्याचे धैर्य खचण्याची आणि मग तो काम सोडून देण्याची शक्यता असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा चळवळीच्या उपक्रमांची माहिती करुन देणे किंवा त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षाची […]
टॅग: डॉ. नरेंद दाभोलकर
सप्टेंबर 1993 साली वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प शिबीर नाशिकच्या म.वि.प्र.समाजाच्या मराठा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. अंनिसचे काम जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने इतर 25 माध्यमिक शिक्षकांबरोबर माझ्यासह माझी पत्नी व माझी तीनही मुलं यांनी दोन दिवसीय पूर्ण शिबीर केले. डॉक्टरांनी आमच्याशी जेव्हा ‘संवाद’ सुरू केला तेव्हा आम्ही अगदी ‘भारावून’ गेलो. डॉक्टरांनी सलग 2-3 विषय घेतले. माझा […]
मी एक सर्जन असून माझे हॉस्पिटल दोंडाईचा (जि.धुळे) येथे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि माझा प्रथम परिचय साधारण वीस एक वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टर दाभोलकर आणि डॉ. श्रीराम लागू दोंडाईचा येथे एका कार्यक्रमास आले होते तेव्हा झाला. त्यावेळी शिंदखेडा येथील अंनिसचे कार्यकर्ते प्रा. परेश शहा डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आले होते कारण प्रा. परेश शहा यांना […]
कार्यकर्त्याला सतत प्रोत्साहन
ऑगस्ट 2012 मध्ये मी माझे नैसर्गिक वडील गमावले व ऑगस्ट 2013 मध्ये मी माझे सामाजिक कार्यातले वडील गमावले. केवढे हे आभाळाएवढे दु:ख. आय.एल.एस.विधी महाविद्यालय, पुणे येथे बारावीनंतर प्रथम वर्ष एल.एल.बी.त शिकत असताना मी डॉ. दाभोलकर यांचे भाषण पुण्यात पहिल्यांदा ऐकले त्याला जवळपास आता 25 वर्ष लोटली. मी तेव्हा खूप प्रभावित झाले होते. लग्न झाल्यानंतर, वकिली […]
गुरूवार 20 ऑगस्ट 2013. वेळ सकाळी 7 वा. एका पत्रकार मित्राचा फोन आला. डॉ. दाभोलकरांच्यावर पुण्यामध्ये अज्ञाताचा गोळीबार. मन सैरभैर झाले, बातम्या लावल्या व धक्का बसणारी बातमी दिसली…. डॉक्टर आमच्यातून निघून गेले होते. मन सुन्न झाले.. तरी सुद्धा मनातील खोटी आशा. राहुल थोरातला फोन लावला व राहुलने पुण्यास निघा हा निरोप देऊन फोन ठेवला, हे […]
बाबा आमटे यांच्या आनंदवनातील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर 2002 मध्ये एक प्रशिक्षणार्थी म्हणून डॉ. दाभोलकरांसोबत पहिली ओळख झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2004 मध्ये 18 व 19 सप्टेंबरला चंद्रपुरातील मातोश्री सभागृहात जिल्हास्तरीय दुसरे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये डॉ. दाभोलकरांचे विज्ञाननिष्ठ व विवेकवादी विशेष व्यक्तीमत्व मला जवळून अनुभवता आले. त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वामुळेच मी […]
सुमारे 18-19 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचा कुटुंब मेळावा सातारा येथे आयोजित केला होता. मी कुटुंबीयांसह सातार्याला निघालो होतो. रस्त्यात सोलापूरला लातूरचे कार्यकर्ते प्रा. ओमप्रकाश मदनसुरे कुटुंबियासह भेटले. मी, पत्नी, दोन मुली, मदनसुरे यांच्या पत्नी, त्यांची दोन मुले असे आम्ही सोलापूर-सातारा बसमध्ये रात्री 10 वाजता बसलो. पहाटे 3 वाजता बस सातार्याला पोहोचणार […]
जिवंतपणाला स्फूर्ती देणारं शक्तीस्थळ
1990 साल डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख वाचनात आला. लेख वाचल्यानंतर डॉक्टरांच्या विचारांनी प्रेरित झालो आणि त्यावेळी डॉक्टरांच्या बरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करण्याचा माझा विचार पक्का झाला. त्यानंतर गेली 24 वर्षे मागे वळून न पाहता डॉक्टरांच्या विचाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करत आलो आहे. डॉक्टरांचा प्रत्येक कार्यकर्त्यांवर असलेला दृढ विश्वास मला अनुभवास आला. […]
शाखा भेटीच्या निमित्ताने डॉक्टरांचा मराठवाडा दौरा होता. सुमारे 18-19 वर्षांपूर्वीचा काळ असेल सोलापूर येथील कार्यक्रम आटोपून डॉक्टर उमरगा येथे आले होते. दिवसभराच्या कार्यक्रमांचे नियोजन ठरले होते. काही प्रमुख शिक्षण संस्था, हितचिंतक, जाहिरातदार भेटी दरम्यान डॉ.दामोदर पतंगे, राजू सगर, डॉ.मल्लिनाथ मलंग, प्राचार्य भांडेकर आदी मंडळींची भेट घेतली. शहर शाखेस मदत-जाहिराती आदींची आश्वासने घेऊन आम्ही घरी पोहोचलो. […]
डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण हत्येची बातमी काही तासातच जगभरच्या प्रसार माध्यमापर्यंत 20 ऑगस्ट 2013 रोजी वार्यासारखी पसरली. वार्ताहरच बातमी ऐकून सुन्न झाले होते. 21 ऑगस्टच्या अंकात मुद्रित माध्यमांनी आपापल्या वृत्तपत्रात टिप्पणीसहित ठळक मथळे देत या बातमीला प्रसिद्धी दिली. केवळ मुद्रित माध्यमच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक माध्यमं, ब्लॉग्स, टीव्ही, इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर, इत्यादी संपर्क माध्यमाद्वारे दाभोलकराबद्दल, त्यांच्यावरील भ्याड […]