Categories
व्यक्तिविशेष

डॉक्टरांनंतरचे एक वर्ष

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

20 ऑगस्ट, 2013 रोजी डॉक्टरांच्या अखेरच्या दर्शनासाठी सातार्‍याकडे गाडी धावत होती. अश्रूंना वाट देता देता विचारचक्र सुरू होते. त्यांच्या चितेचे दर्शन घेऊन माझ्या भावनांना वाट करून दिली. या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध करत डॉक्टरांच्या जाण्याचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. डॉक्टरांसारख्या कुशल आणि प्रतिभावान नेतृत्वामुळेच […]

Categories
डॉ. दाभोलकर खून तपास

तपास….

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

“ 20 ऑगस्ट 2013….!” ‘यापुढे काही लिहिणे टाळण्याचे एकेक मार्ग माझ्या मनात आणि कृतीत येत राहिले. …. चहा करून घेणे. ….अस्ताव्यस्त पडलेले कपडे आवरायला घेणे. …पाऊस उघडलाय म्हणून चालायला बाहेर पडणे असं काहीही करत राहिले मी.’ खरेतर ‘या घटनेबाबत’ किती विवेकाने आणि संयमाने व्यक्त होत आलो आहोत आपण सर्वजण गेले वर्षभर! डॉक्टरांना ठार मारण्यात आलं […]

Categories
संपादकीय

मरण मरूनी गेले – मज केले अमर

मार्च - २०१४

हरिनामाच्या रूपाने विवेकाची पताका फडकवत मृदुंगाच्या निनादावर खर्‍या वारकर्‍यांनी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर विचारांचा जागर घातला. याच ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अविचार्‍यांनी गोळ्या घातल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराज फडतरे, श्यामसुंदर सोनार महाराज व तत्सम कीर्तनकार वारकरी यांनी 20 फेब्रुवारी 2014 रोजी या निमित्ताने कीर्तनरूपात जनप्रबोधन केले. आम्ही महाराष्ट्र अंनिसच्या वतीने सर्व विवेकी वारकर्‍यांना धन्यवाद देतो. […]

Categories
चळवळ

‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ डी.व्ही.डी.चे अमोल पालेकर यांचे हस्ते प्रकाशन

मार्च - २०१४

समाजातील अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अथक प्रयत्न केले. आपल्या तर्कशुद्ध मांडणीमुळे अनेकांचे प्रबोधन करण्यात ते यशस्वी ठरले. परंतु एकटे डॉक्टर सर्व दूर पोहचणे शक्य नसल्यामुळे त्यांचे विचार सी.डी./डी.व्ही.डी. स्वरूपात प्रकाशित करावेत अशी कल्पना ‘मॅग्नम ओपस’चे गिरीश लाड यांनी मांडली. आणि त्याप्रमाणे 7 […]

Categories
आंदोलन संतविचार

कीर्तनातून उलगडला दाभोलकरांचा विवेकवाद

मार्च - २०१४

पुणे – कपाळी अष्टगंध, डोईवर केशरी पटका, हाती टाळ अन् मुखी लाडक्या विठोबाचे नाव… हरिनामाची पताका फडकवत मृदंगाच्या निनादावर जागर चालला होता… विवेकाचा, विचाराचा अन् संघर्षाचा. नोकरीवर जाण्याच्या गडबडीतही गुरुवारी सकाळी प्रत्येक जण थोडासा थबकत होता… उत्सुकतेने क्षणभरासाठी का होईना ऐकत होता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण झाल्याने पुरोगामी परंपरेची आठवण करून […]

Categories
संपादकीय

गड आला पण सिंह गेला

जानेवारी - २०१४

जादूटोणा विरोधी कायद्याचा गड हाती आला. 18 डिसेंबर 2013 रोजी रात्री 9.40 वाजता विधानपरिषदेत आवाजी मतदानाने कायदा मंजूर झाला. पण तो प्रसंग पहायला, जनसामान्यांचे अंधविश्वासापासून शोषण थांबविण्याचे स्वप्न पहाणारे व त्यासाठी कायदा व्हावा म्हणून 18 वर्षे झुंज देणारे सेनापती डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नव्हते याची वेदना सर्वांच्या अंत:करणात होती. 20 ऑगस्टला अंधश्रद्धेच्या लाभार्थींनी दाभोलकरांचा खून […]

Categories
कायदा

कायदा झाला डॉक्टर……

जानेवारी - २०१४

प्रिय डॉक्टर, विधानपरिषदेचे अध्यक्ष एक-एक वाक्य शांतपणे वाचत होते…. “सन 2013 चे विधेयक क्रमांक 34- महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे विधेयक ज्यांना मंजूर असेल त्यांनी होय म्हणावे, मंजूर नसेल त्यांनी नाही म्हणावे…. होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे बहुमत!” तुमची अठरा वर्षांची […]

Categories
चळवळ

विवेकवाद तळागाळात रूजविण्याचा निर्धार

जानेवारी - २०१४

अंनिसच्या राज्यव्यापी मेळाव्यात डॉ. दाभोलकरांना अभिवादन! अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 1 सप्टेंबर 2013 सातार्‍यात पार पडलेल्या राज्यव्यापी निर्धार मेळाव्याच्या पहिल्या सत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचा तसेच त्यांचे कृतीशील व विवेकी विवार तळागाळापर्यंत रूजवण्याचा निर्धार समितीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी केला. डॉ.दाभोलकर यांनी निर्माण केलेले विवेकाचे, समतेचे नवे पर्वच माणसाला प्रगतीकडे घेऊन जाईल असा […]

Categories
आठवणीतले दाभोलकर

हे सारे येते कुठून?

वार्षिकांक – २०१३

बहुसंख्य कार्यकर्ते स्वत:चे कुटुंब व स्वत:चा व्यवसाय सांभाळून तीन नंबरच्या प्राधान्यक्रमाने समितीचे कार्य करतात आणि ते बहुतेक वेळा घरचे खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजतात. अंनिसची शाखा चालवण्यासाठी कोणालाही कसलीही मदत मध्यवर्ती देत नाही. स्वत:चे पैसे स्वत: उभारावे व खर्च करावेत अशीच कल्पना आहे व त्याची अंमलबजावणी होते. राज्यकार्यकारिणी वर्षातून तीन वेळा होते. अत्यंत नियमाने कार्यकारिणी सदस्य […]

Categories
आठवणीतले दाभोलकर

केल्याने होत आहे रे!

वार्षिकांक – २०१३

वीस ऑगस्ट 2013 चा दिवस डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर हल्ला झाला. मोटार सायकलवरून आलेल्या दोन मारेकर्‍यांनी गोळ्या झाडल्या. अखंड तेवणारा हा नंदादीप क्षणात विझला. झंझावात शांत झाला. पुन्हा कदाचित एवढा विचारवंत निर्माण होणार नाही. या खात्रीने प्रतिगामी शक्तीही शांत झाल्या. अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. राजकारणी, समाजकारणी, अभिनेते, बुद्धिवादी, सामान्यजन या सर्वांनी विविध मार्गांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. इंटरनेट, […]