Categories
अभियान कव्हर स्टोरी

जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रा

जुलै - २०१४

वाचकहो, मे 2014 च्या अंकात आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसंवाद यात्रेची सफर गडचिरोली जिल्ह्यापर्यंत केली. आता आपण ही सफर पुढे चालू करत आहोत. चंद्रपूर जिल्ह्यापासून 16 एप्रिल सकाळी 9.30 ते 12.30 शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाडखुर्द (ता.सावली) चा कार्यक्रम करून दुपारी 1.30 ते 3.30 राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय(सावली) येथे कार्यक्रम सादर […]

Categories
अभियान

जनसंवाद यात्रेचा कोल्हापूरात समारोप

जुलै - २०१४

18 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हौतात्म्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दि.22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम काढला आणि दि. 18 डिसेंबर नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. या कायद्यामुळे अंधश्रद्धेमुळे घडणार्‍या काही विशिष्ट कृती या गुन्हा ठरवल्या असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. वटहुकुमानंतर लागलीच या कायद्यानुसार […]

Categories
कायदा

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत आजपर्यंत 70 गुन्हे दाखल

जुलै - २०१४

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रबोधन व प्रभावी अंमलबजावणीमुळे शोषित कुटुंबांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. अनेक भोंदू लोकांनी काळेधंदे बंद केल्याची माहिती मिळत असतांना अनेक तक्रारीही महाराष्ट्र अंनिसकडे येत आहेत. अंनिस, समविचारी संघटना व प्रशासनाच्या मदतीने गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. आजपर्यंत(14 जून पर्यंत) नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या सत्तरच्यावर गेली आहे. त्यातील बाकी घटनांचा आढावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर […]

Categories
अभियान कायदा

थक्क करणारा प्रतिसाद आणि सलग यात्रेचा विलक्षण अनुभव

मे - २०१४

जादूटोणाविरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रव्यापी जनसंवाद यात्रा दि.9 मार्च 2014 पासून चवदार तळे, महाड, जि.रायगड येथून सुरू झाली. आजपर्यंतचा(दि.15 एप्रिल 2014) या यात्रेचा प्रवास वाचकांसाठी थोडा सविस्तर लिहित आहे. ज्या कायद्यासाठी शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी 18 वर्षे अथक परिश्रम घेतले. पण त्याची अंमलबजावणी पहाण्यासाठी आज डॉक्टर आपल्यात नाहीत ही वेदना मनात आहेच. कायदा झाला पण […]

Categories
शाखा वार्ता

शाखा उपक्रम

मे - २०१४

संगमनेर अंनिसने केली विकृतीची होळी होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करताना लाकूड, गोवर्‍या(शेण्या) जाळल्या जातात व एक प्रकारे पर्यावरण र्‍हासाला मदतच होत असते. काळानुसार रूढी, परंपरांमध्ये बदल तर केलाच पाहिजे. परंतु आज सामाजिक स्थिती लक्षात घेता खरी गरज आहे दुष्कृत्य, हिंसाचार, भ्रष्टाचार, स्त्रीभृणहत्या, स्त्री देहावरील अत्याचार ज्या विकृत विचारातून व विकलांग मनोवृत्तीतून घडतात त्या प्रकृतींची […]

Categories
महिला

पुरोगामी महाराष्ट्रात बुवा-बाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण

मार्च - २०१४

तुळजापुरात महेबूब कुरणे या बुवाने विवाहित महिलेवर केला बलात्कार तुळजापूर तालुक्यातील एका मुलीचे लग्न आलूर येथील रवी शंकर मडीवाळ यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर एक वर्ष रवी शंकर मडीवाळ यांनी या मुलीस व्यवस्थित नांदवले, त्यांनतर या मुलीस मूल होत नाही म्हणून तिला मानसिक व शारीरिक त्रास करू लागले. नंतर महानंदा मुनाळे हिने मुलीची सासू […]

Categories
महिला

जादूटोणाविरोधी कायदा : स्त्रियांच्या शोषणमुक्तीचा नवा आयाम

मार्च - २०१४

गेल्या सहा महिन्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकजागराशी जोडलेल्या अनेक मुद्यांवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी, नागरिक यांच्याशी मला संवाद साधता आला. कार्यक्रमासाठी मुलांइतक्याच मुली उपस्थित असायच्या. अशाच एका कार्यक्रमात एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करतो; या शिबिरात अनेक मुले रक्तदान करतात पण रक्तदान करण्यासाठी मुली पात्रच ठरत नाहीत. त्यांची इच्छा […]

Categories
कायदा परिषद

मुंबईत जादूटोणा विरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी परिषद संपन्न

मार्च - २०१४

महाराष्ट्रातील अघोरी, अमानुष व अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचे पाऊल संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी जादूटोणाविरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी राज्यव्यापी परिषद रविवार दि.9 फेब्रुवारी 2014 रोजी चेतना कॉलेज, बांद्रा येथे घेण्यात आली. परिषदेस राज्यभरातून महाराष्ट्र अंनिसचे सुमारे 500 कार्यकर्ते, विविध […]

Categories
कायदा

जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनास मअंनिसचा प्रस्ताव सादर

मार्च - २०१४

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर व अंनिसच्या वीस वर्षाच्या अथक संघर्षामुळे महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला. परंतू या नव्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस प्रयत्नशील आहे. याबाबत शासन आपल्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीने काय काय करू शकते याबाबींचा प्रस्ताव नुकताच शासनास सादर करण्यात आला. तो अंनिवांच्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. –अविनाश पाटील महाराष्ट्र शासनाच्या […]

Categories
कायदा

भूत उतरविणार्‍या बाबा विरोधात खटला

फेब्रुवारी – २०१४

जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आता सर्वत्र सुरू झाली आहे. या कायद्यातील अनुसूचीमध्ये जी 12 कलमे आहेत त्यांचे अधिक स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. या कलमासंदर्भात विविध शंका व प्रतिवाद निर्माण केले जातील. यांचे समर्पक स्पष्टीकरण देणारे ‘अभिरूप न्यायालय’ हे सदर आम्ही या अंकापासून सुरू करीत आहोत. माय लॉर्ड! आजची केस जरा विचित्रच आहे, असे म्हणता येईल. कारण […]