Categories
अभियान कायदा

थक्क करणारा प्रतिसाद आणि सलग यात्रेचा विलक्षण अनुभव

मे - २०१४

जादूटोणाविरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रव्यापी जनसंवाद यात्रा दि.9 मार्च 2014 पासून चवदार तळे, महाड, जि.रायगड येथून सुरू झाली. आजपर्यंतचा(दि.15 एप्रिल 2014) या यात्रेचा प्रवास वाचकांसाठी थोडा सविस्तर लिहित आहे. ज्या कायद्यासाठी शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी 18 वर्षे अथक परिश्रम घेतले. पण त्याची अंमलबजावणी पहाण्यासाठी आज डॉक्टर आपल्यात नाहीत ही वेदना मनात आहेच. कायदा झाला पण त्याचा प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी यासाठी अंनिस चळवळीने एक महत्वाकांक्षी सलग 85 दिवस 34 जिल्हे आणि 250 पेक्षा जास्त प्रबोधनाचे कार्यक्रम करण्याचा जणू विडाच उचलला. मनामध्ये अत्यंत अस्वस्थता, कमी वेळात आणि परीक्षा व निवडणुकींचा काळ अशा अडथळ्यांमधून कसे होणार या प्रबोधन यात्रेचे? विचारांनी मन सतत भरे. पण सर्व प्रश्नांना अतिशय चोख आणि कृतीशील उत्तर दिलंय आपल्या अंनिसच्या शाखांनी आणि त्यातील आपल्या तळमळीच्या अशा विवेक साथींनी. चला तर सफर करूयात आजपर्यंत झालेल्या यात्रेतील प्रबोधनाच्या कार्यक्रमांची.

9 मार्च चवदार तळ्यावर डॉ.बाबा आढावांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू झालेली यात्रा रात्री मुक्कामी पोहचली साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, जि.रायगड या ठिकाणी. डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे (इंजिनिअरिंग) शिबीर चालू होते. या विद्यार्थ्यांसमोर जादूटोणा विरोधी कायदा व अंनिस चळवळ आणि विवेकवाहिनी याबाबत संवाद झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी वसंतराव नाईक कॉलेज ऑफ आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स, म्हसळा, जि.रायगड दुपारी माध्यमिक शाळा पाष्टी, ता.म्हसळा, जि.रायगड आणि सायंकाळी माध्यमिक शाळा, संदेरी, ता.म्हसळा, जि.रायगड असे एकूण तीन कार्यक्रम करून रात्री परत मुक्कामी साने गुरूजी स्मारक. 11 मार्च सकाळी गाठले द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा आणि दुपारी डी.एड.कॉलेज वेश्वी, ता.अलिबाग, जि.रायगड करून रात्री अलिबागला निलेश घरत यांचेकडे मुक्काम.

12 मार्च सकाळी 10.30 वाजता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम. चक्क पोलिसांचेच ट्रेनिंग. संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक पोलीस याला हजर. स्वत: होम डी.वाय.एस.पी.गाडेकरसाहेब पूर्णवेळ उपस्थित. पुढे रात्रीच्या कार्यक्रमाला नवीन पनवेल गाठायचे होते. रात्री 8 वाजता बौद्धवस्तीत जाहीर कार्यक्रम करून प्रसिद्ध जादूगार अंनिसचे कार्यकर्तेहांडेसर यांच्याकडे मुक्काम. 13 मार्चला सकाळी 6 ला प्रवासाला सुरवात करून गाठले गोरेगाव. केशव गोरे स्मारक ट्रस्ट, डोंगरी(पश्चिम), मुंबई येथे 11 ते 1.30 कार्यक्रम करून दुपारी 2.30 वाजता गुरूकुल इंग्लिश स्कूल मालवणी मालाड आणि रात्री अंधेरी एम.आय.डी.सी. येथे जाहीर कार्यक्रम करून मुक्कामी विजय परब यांचे घरी. 14 मार्च सकाळी नेहरूनगर अभ्युदय को.ऑप.बँक कॉर्नर, मुंबई येथे भर चौकात 9.30 ते 11.30 कार्यक्रम करून दुपारी 3 वाजता गाठले रूईया कॉलेज आणि रात्री 7 वाजता कोळीवाडा वस्तीत जाहीर कार्यक्रम करून दुसरे दिवशी 15 मार्च सकाळी ठाणे जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना. सकाळी 9 वाजता एस.डी.टी.कलाजी डी.एड.कॉलेज कार्यक्रम करून दुपारी 12 वाजता गोखले रहाळकर माध्यमिक विद्यालय, अंबरनाथ तेथून 3 वाजता मंजूनाथ कॉलेज ऑफ कॉमर्सचा कार्यक्रम करून रात्री आखिल भारतीय समता सैनिक दल-धोबी घाट सिद्धार्थनगर ठाणे येथे कार्यक्रम करून वंदनाताईंकडे मुक्काम. 16 मार्च सकाळी 10 वाजता प्रियांका महिला अन्याय कृती समिती, रामनगर, दिघा नवी मुंबई या ठिकाणी प्रबोधन करून दुपारी 1 वाजता रिप संस्था, हाजीमलंग रोड, आडिवलीगाव येथे कार्यक्रम. रात्री शहापूर येथील गणेशवाडी येथे गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री संजय कांबळे यांचेकडे मुक्काम. दुसरे दिवशी 17 मार्च धुलवडीची सुट्टी असल्याने यात्रेकरूंनी थोडी विश्रांती घेतली व यात्रेच्या गाडीची कामे करून रात्री मोखाड्याला प्रवास करून मुक्कामी. रात्री मंदिरात 10 ते 11 कार्यक्रम करून दुसर्‍या दिवशी 18 मार्चला 11 ते 12.30 कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजवर कार्यक्रम करून रात्री नाशिककडे यात्रा रवाना. 19 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 सिन्नर, जि.नाशिक येथे म.वि.प्र.समाजाचे अध्यापक येथे कार्यक्रम करून दुपारी शेठ बस्तीराम नारायणदास सारडा विद्यालय, सिन्नर येथे प्रबोधन करून रात्री शिवाजीनगर, सिन्नर येथे जाहीर संवाद करून रात्री मुक्कामी नाशिक.

20 मार्च रोजी सकाळी 8 ते 10 महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, नाशिक येथे कार्यक्रम करून दुपारी 12 ते 2 न्यू.कॉलेज ऑफ एज्युकेशन येथून ओझर विंग येथे 5.30 ते 7.30 जाहीर कार्यक्रम. 21 मार्च श्री.नामदेव रामचंद्र देवर सभागृह, वणी येथे सकाळी 9 ते 11 प्रबोधन करून पुढे 2 ते 2.30 आर.के.एम.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळवण येथे यात्रेचा कार्यक्रम करून रात्री नंदूरबार जिल्ह्याकडे जनसंवाद यात्रा रवाना नवापूर मुक्कामी. 22 मार्च सकाळी 9.30 ते 11.30 श्री.डी.एच.अग्रवाल कला, श्रीरंग अवधूत वाणिज्य आणि श्री.सी.सी.शहा व एम.जी.अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, नवापूर येथे प्रबोधनपर कार्यक्रम. दुपारी 2 ते 4 श्रीमती प्रतापबा अभेसिंग मोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल हाजी ए.एम.व्होरा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे कार्यक्रम करून 4.30 ते 5.30 पत्रकार व प्राध्यापक तसेच नवापूर अंनिस शाखा कार्यकर्ते यांच्याशी संवाद करून पुढे 23 मार्चला शहादा. सकाळी 9.30 ते 12.30 एम.एस.डब्ल्यू. व बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रम करून 4 ते 5.30 शहादा अंनिस कार्यकर्त्यांशी संवाद करून 24 मार्चला सकाळी 8.30 वाजता शेठ व्ही.शहा अध्यापक विद्यालयातून दुपारी 11 वाजता वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथे कार्यक्रम सादर करून दुपारी 1 वाजता साने गुरूजी अध्यापक विद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रम करून रात्री शहादा येथील सर्व कार्यकर्त्यांच्या गृहभेटी व संवाद कार्यक्रम करून दुसर्‍या दिवशी 25 मार्चला धुळे जिल्ह्याकडे यात्रा रवाना. सकाळी 9 वाजता नूतन माध्यमिक विद्यालय, दोंडाईचा येथे प्रबोधनपर कार्यक्रम करून दुपारी पिंपळनेर एज्यु.सोसा.संचलित मातोश्री नर्मदा नारायण पाटील अध्यापक पदविका विद्यालयात कार्यक्रम करून सायंकाळी 4 वाजता साक्री न्यू.इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यक्रम करून धुळ्याला मुक्कामी. 26 मार्चला सकाळी 10 वाजता प्याराबाई सोमणी विद्यालय, धुळे येथील कार्यक्रम करून यात्रा शिरपूरकडे मार्गस्थ. रात्री शिरपूर गावात जाहीर कार्यक्रम करून यात्रेचा जळगाव जिल्ह्यात प्रवेश. 27 मार्च रोजी सकाळी 10 वाजता अंमळनेर महाविद्यालयात कार्यक्रम करून दुपारी 2 वाजता पारोळा येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, टेहू अध्यापक विद्यालयात कार्यक्रम करून सायंकाळी विठ्ठल मंदिर, धरणगाव येथे महिलांच्यासमोर प्रबोधन व रात्री एरंडोल येथे जाहीर कार्यक्रम करून एरंडोल मुक्कामी. दुसरे दिवशी 28 मार्च सकाळी 8 वाजता अमळदा, ता.भडगाव येथे गावातील चौकात जाहीर कार्यक्रम करून दुपारी भडगाव पारोला अध्यापक विद्यालय टेहू डी.एड.कॉलेजवर प्रबोधन करून सायंकाळी 4 वाजता नवजीवन विद्यालयात वकील व अंनिस कार्यकर्ते पाचोरा शाखा यांच्याशी संवाद रात्री मुक्कामी कट्यारे सरांकडे जळगावला. दुसरे दिवशी 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आय.टी.आय. मुलींचे महाविद्यालय येथे प्रबोधन करून दुपारी 11.30 ते 1 वाजता महिला अंगणवाडी शिक्षिका जिल्हा परिषद हॉल येथे सी.ओ.मॅडम शितल ओगले यांचे उपस्थितीत प्रबोधन. पुढे सायंकाळी 4 वाजता पोलीस मुख्यालयात मंगलम कार्यालय येथे होम डी.वाय.एस.पी.किशोर पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 80 पोलिसांचे कायदा प्रशिक्षण करून भुसावळला शिव हनुमान मित्र मंडळ आयोजित कार्यक्रम प्रबोधन रात्री जळगाव मुक्कामी. दि.30 मार्चला सकाळी 9 ते 6 पर्यंत गाडीतील सर्व सामान आवरणे व इतर हिशोब अहवाल पूर्ण करून सायंकाळी 6.30 वाजता पाळधी, ता.धरणगाव या नरेंद्र महाराजांच्या भक्तांच्या गावातच जाहीर कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद. रात्री जळगावात मुक्काम करून 31 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता गुढी पाडव्यानिमित्त काव्यरत्नावली चौकात अधांतरी साध्वी बसवून जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक वनीकरण, जळगाव यांनी याला विशेष सहकार्य केले आणि यात्रेचे पुढील जिल्हा अकोल्याकडे प्रवास चालू केला.

1 एप्रिल सकाळी 12 पर्यंत विश्रांती करून दुपारी 2.30 ते 3.30 शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयात लायब्ररीमध्ये अभ्यासिकेत विद्यार्थ्यांशी संवाद. सायंकाळी 6 ते 8 नेहरू सेंटर व पार्कला भेट व रात्री अकोला मुक्काम. 2 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी अकोला येथे प्रबोधनपर कार्यक्रम. दुपारी 4 वाजता शासकीय आय.टी.आय. महाविद्यालयात संवाद व रात्री बपेरी, ता.मुर्तिजापूर येथे गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री वाशिमकडे प्रवास व मुक्काम. 3 एप्रिल सकाळी 9 वाजता वाशिम येथे डॉ.आंबेडकर चौकात यात्रेचे स्वागत व संवाद दुपारी 2 वाजता जिल्हा न्यायाधीश यांचे अध्यक्षतेखालीच सर्व न्यायाधीश व वकिलांसाठी कार्यशाळा घेऊन रात्री काटा या गावी जाहीर कार्यक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने पार पडला. रात्री मुक्काम त्रिरत्न बुद्ध विहार येथे करून 4 एप्रिल रोजी दुपारी याच बुद्धविहारात प्रबोधनपर कार्यक्रम करून अमरावती जिल्ह्याकडे प्रयाण. 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रामकृष्ण क्रिडा माध्यमिक आश्रमशाळा येथे कार्यक्रम करून रात्री 7 वाजता बुद्धविहार, सिद्धार्थनगर येथे जाहीर कार्यक्रम. 6 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता कामगार कल्याण केंद्र, प्रशांतनगर येथे कार्यक्रम करून 4 वाजता भीमवाडा परिगणिक कॉलनी येथे जनसंवाद झाला. 7 एप्रिलला सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) येथे कार्यक्रम करून दुपारी 3.30 वाजता अंगुलीबाग बुद्ध विहार, वाठोडा व रात्री बुद्ध विहार राहुल कॅम्प, अमरावती येथे जनसंवाद करून रात्री मुक्काम अमरावती. 8 एप्रिल रोजी सकाळी नागपूर जिल्ह्याकडे प्रवास दुपारी 1.30 वाजता हनुमान मंदिर प्रांगण येनवा, ता.काटोल येथे कार्यक्रम(अखंड हरिनाम सप्ताहामध्ये) सायंकाळी 6 वाजता धम्म ज्योती बौद्ध विहार म्हाडा कॉलनी, हिंगणा रोड येथे जनसंवाद, 9 एप्रिल सकाळी 11 वाजता श्रीमती नरगुंदकर अध्यापक महिला विद्यालय, नागपूर येथील कार्यक्रम करून दुपारी 2 वाजता रूबी सोशल वेल्फेअर सोसा. येथे जनसंवाद करून सायंकाळी 5 वाजता जुना सुभेदार ले आऊट एक्स्टेंशन, अयोध्यानगर येथे कार्यक्रम केला. 10 एप्रिल या दिवशी मतदान असल्याने नागपूरच्या कार्यकर्त्यांशी संवाद केला. 11 एप्रिल कळमेश्वर हायस्कूलमध्ये 9 ते 11.30 कार्यक्रम करून सिल्लोरी तहसील सावनेर प्रार्थना मंदिरात कार्यक्रम सादर केला. रात्री मौदा शाखेतर्फे जाहीर कार्यक्रम करून भंडारा जिल्ह्याकडे रवाना. 12 एप्रिल सकाळी 10 ते 11.30 महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा डी.एड.कॉलेजमध्ये कार्यक्रम करून दुपारी 12 ते 2 अनुराग अध्यापक विद्यालय वरठी येथे संवाद करून दुपारी 3 ते 3.30 कार्यकर्त्यांची बैठक झाली. 4 ते 5 शाखेच्या कार्यकर्त्यांशी संवाद करून गोंदियाकडे प्रयाण.

12 एप्रिल रोजी गोंदियामध्ये रात्री 9 ते 10.30 रामनगरी या वसाहतीत जाहीर कार्यक्रम. दि.13 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 2.30 सुभाष शाळेचे प्रांगण, गोंदिया येथे प्रबोधन. दुपारी 3 वाजता गडचिरोली जिल्ह्याकडे रवाना. रात्री 8 वाजता आरमोरी गावात पोचून मुक्काम. 14 एप्रिल फिनिक्स संस्थेद्वारा दुपारी 1 ते 2.30 जनसंवाद कार्यक्रम. रात्री 10 ते 11.30 बुद्धविहार विद्याबर्डी येथे जाहीर कार्यक्रम. 15 एप्रिल रोजी 9 ते 10 इंदिरा चौकात यात्रेचे स्वागत. 11 ते 12 सर्चला भेट. डॉ.राणी व अभय बंग यांच्याशी चर्चा, 12 ते 1 पत्रकार परिषद. 6.30 ते 7.30 विसापूर येथे कार्यक्रम. 8 ते 9 कोर्टगल येथे प्रबोधन कार्यक्रम करून पुढे यात्रा चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना…. काय दमलात वाचून? हा तर फक्त 37 दिवसांचा प्रबोधनाचा कृतीशील कार्यक्रमांचा तपशील आहे. अजून 48दिवसांची यात्रा बाकी आहे. बाकी वृत्तांत पुढील अंकात….

डॉ.दाभोलकरांच्या नंतर चळवळ थांबेल अशा भ्रमात रहाणार्‍यांना अंनिसच्या सर्वच शाखा व साथींनी या कृतीशील प्रबोधनातून चोख प्रतिउत्तर दिले आहे. यापुढेही याच जोमाने ही यात्रा अंनिस साथींच्या मदतीने निश्चित पूर्ण होईल असा विश्वास आहेच….. डॉ.दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ….

प्रशांत पोतदार

लेखक संपर्क : 9421121328

आजपर्यंत संपूर्ण यात्रेत कृतीशील सहभाग देणारे कार्यकर्ते.

भगवान रणदिवे, सातारा. 2) नंदिनी जाधव, पुणे. 3) वंदनाताई शिंदे, ठाणे. 4) श्रीकृष्ण धोटे, अमरावती. 5) शहाजी भोसले, औरंगाबाद. 6) गजेंद्र सुरकार, वर्धा. 7) प्रकाश डब्बावार, यवतमाळ. 8) प्रशांत पोतदार, सातारा.

आजपर्यंत एक नजर कार्यक्रम संख्या व उपस्थितीवर पूर्ण झालेले जिल्हे कार्यक्रमांची संख्या उपस्थिती

ठाणे – 4 दिवस – 9 – 1120
नाशिक- 3 दिवस – 8 – 1521
नंदूरबार – 3 दिवस – 8 – 1275
धुळे- 2 दिवस – 5 – 1051
जळगाव- 5 दिवस – 13 – 2258
अकोला- 2 दिवस – 4 – 458
वाशिम – 2 दिवस – 4 – 435
अमरावती- 3 दिवस – 10 – 999
नागपूर – 4 दिवस – 7 – 709
भंडारा – 1 दिवस – 4 – 200
गोंदिया – 1 दिवस – 2 – 190
गडचिरोली- 2 दिवस – 4 – 450

38 दिवसांपर्यंत एकूण-92 कार्यक्रम एकूण 13,046 लोकांपर्यंत.

* सर्व थरांतील समाजासमोर प्रबोधन. *पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वकील यांचे विशेष प्रशिक्षण. *यात्रेतील कार्यकर्त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल व काळजी. *90 टक्के ठिकाणी टोल माफ केला. *पुस्तक, सी.डी.विक्री याला उत्तम प्रतिसाद. * अनेक बुवाबाजीच्या तक्रारींची नोंद. *चळवळीत सहभागी होऊ इछिणार्‍यांची मोठ्या प्रमाणात नोंद. *निवडणूक काळातही प्रसिद्धी माध्यमांनी उत्तम प्रसिद्धी दिली.