महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी लातूर जिल्ह्यात रोटरी क्लबच्या सहकार्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम लातूर शहर व परिसरात आयोजित केले होते. त्यावेळी मी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात रोखपाल या पदावर कार्यरत होतो. तसेच छात्रभारती या पुरोगामी विचाराच्या विद्यार्थी चळवळीत काम करीत असताना डॉ.दाभोलकर छात्रभारतीचे सल्लागार असल्यामुळे मी त्यांचेे सर्वच कार्यक्रम पाहिले, ऐकले […]