Categories
व्यक्तिविशेष

साधेपणा

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण. या ठिकाणी फेब्रुवारी 2013 मध्ये राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक अलिबाग जवळच्या वरसोलीतील पर्णकुटी येथे आयोजित करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर गेल्या वीस वर्षांत अलिबागला दोन तीन वर्षाआड तरी यायचेच. पण या राज्यकार्यकारिणी बैठकीचे वेळी मला डॉ. दाभोलकरांच्या निरसलतेची व साधेपणीची जाणीव प्रकर्षाने झाली. बैठकीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मी जेव्हा पर्णकुटीत आलो तर मला काय दिसले तर डॉ. दाभोलकर स्वत: एका कार्यकर्त्याला घेऊन कार्यकर्त्यांच्या गाद्या, अंथरूणे स्वत: उचलून रचून ठेवत होते ते पाहून मी स्तिमीतच झालो.

डॉ. दाभोलकरांचा राज्यव्यापी बैठकीचे वेळी रात्री माझ्या घरी मुक्काम होता पण डॉक्टरांनी रात्री गादी वगैरे न घेता चटई व चादरीचे अंथरूण घेऊन झोपले. खरे तर हा त्यांच्या विलक्षण साधेपणाचा अनुभव आहे. पण नेतृत्वात साधेपणा असावा हा गुण डॉक्टरांकडून शिकायला मिळाला. या दोन्ही घटना माझ्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. त्या कधीही विसरता येणार नाहीत.