Categories
निषेध

20 ऑगस्ट निषेध दिनानिमित्त महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम

ऑक्टोबर - २०१४

डॉ. दाभोलकरांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील अंनिस संघटना तसेच इतर समविचारी संघटना यांनी विविध मार्गांनी अभिवादन कार्यक्रम घेतले. महाराष्ट्राबाहेर पंजाब, केरळ, आंध्र व कर्नाटक राज्यातही अभिवादन सभा झाल्या. या सर्व कार्यक्रमातून डॉक्टरांच्या कर्तृत्वाचे दर्शन तर झालेच. पण त्यांच्या खुनाचा तपास न लागल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला, या निमित्ताने अंनिस समाजात कशी रूजली आहे व अधिक जोरदारपणे कशी कार्यरत आहे याचे दर्शन झाले. अंनिसच्या विकासाला हे आश्वासक आहे. विस्तार भयास्तव नाईलाजाने प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा देणे अटळ झाले याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

1) दक्षिण, पश्चिम महाराष्ट्र

1) बार्शी, जि.सोलापूर येथे निषेध मोर्चा, कर्मवीर मामासाहेब जगदाळे पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा. एआयएसफ. आयटक, घरेलू मोलकरीण संघटना, मराठा सेवा संघ, परिवर्तन विचारमंच, आर.पी.आय., प्रोफेशनल टिचर्स असो., मील कामगार संघ, विविध कॉलेजचे विद्यार्थी.

2) करमाळा, जि.सोलापूर मोर्चा काढून शासनाचा निषेध व संकल्प मेळावा. डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित.

3) सांगोला, जि. सोलापूर मारेकर्‍यांना अटक व्हावी म्हणून तहसील कार्यालयावर 13 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत मोर्चा.

4) गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ज्युनिअर व सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निषेध फेरी, ग्रामपंचायतीच्या आवारात सभा. सभेत दाभोलकरांचे विचार, कायदा व कर्तव्य इ. विषयांवर चर्चा.

5) जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) – 9 ऑगस्ट रोजी युवकांचा संकल्प मेळावा. 20 ऑगस्ट रोजी, निषेधाचे फलक लावून थकज चे सदस्य व मेन्टल हेल्थ विभागाचे डायरेक्टर प्रदीप आवटे यांचे व्याख्यान आयोजित.

6) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) – 9 ऑगस्ट रौप्यपूर्ती निमित्त स्थानिक पत्रात लिखाण. हातकणंगले येथे पोस्टर प्रदर्शन, समविचारी लोकांच्या बैठकीत डॉ. दाभोलकरांच्या कार्याचा पाठपुरावा करण्यासाठी चर्चा.

20 ऑगस्ट रोजी पुस्तक व जुने अंक विक्री, निलिमा माणगावे यांचे भाषण, वार्तापत्र व सभासद नोंदणी. 10 ठिकाणी अभिवादन बॅनर.

7) शिराळा (जि. सांगली) – 9 ऑगस्ट रोजी अंनिस कार्यकर्ते, देणगीदार, हितचिंतक यांचा कुटुंबमेळावा. त्यात 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा. तसेच 100 कार्यकर्त्यांनी देहदान, नेत्रदानाचा संकल्प केला. 10 हजार रूपयांची पुस्तक विक्री, 20 ऑगस्ट रोजी शासनाचा निषेध करणारी रॅली. रॅलीत विश्वासराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मानवी साखळीचे आयोजन व कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार केला. अंनिसच्या आजी-माजी 25 पदाधिकार्‍यांसमवेत मा.तहसीलदार विजया यादव यांना निवेदन देण्यात आले.

8) वाई (जि. सातारा) – शाखेत कुटुंब मेळाव्याऐवजी ‘मुक्त चर्चा सत्र’ चालवले गेले. वैचारिक पातळीवर, लोकशाही पद्धतीने, विवेकी चर्चा झाली.

स्मृती दिना दिवशी डॉ.अनिमिष चव्हाण यांचे ‘अंधश्रद्धांचे मानसशास्त्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशांत पोतदार होते. 9 व 20 ऑगस्टच्या कार्यक्रमाची संघटन वाढीस मदत झाली.

9) इचलकरंजी (जि. कोल्हापूर) – कुरूंदवाड, गडहिंग्लज, नेसरी, आजरा, चंदगड, मुरगुड, वाकारे, कोडोली येथे रॅली व कार्यक्रम झाले.

2) खानदेश

1) चाळीसगाव (जि. जळगाव) – स्मृतीदिनी शासनाचा निषेध, सावित्रीबाई फुले संघटनेतर्फे कार्यक्रमाचे संयोजन, शहरातील विविध सामाजिक संघटनांनी तहसील कार्यालयाजवळ शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. तसेच तपासकामी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन चाळीसगाव शाखेतर्फे करण्यात आले.

2) अंमळनेर (जि. जळगाव) – पंतप्रधानांना पत्र(तपास लागावा म्हणून) उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

3) अहमदनगर निषेध रॅली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन.

4) नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने सर्व समविचारी संस्था, संघटना व पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह येथे अंनिस कार्यकर्त्यांसमवेत निषेध सभा.

5) कासारे (जि. धुळे) – 9 ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा, 20 ऑगस्ट रोजी कासारे शाखेतर्फे निषेध मोर्चा, तसेच साक्री येथील नायब तहसीलदार सोनावणे यांना निवेदन. रॅलीमध्ये विद्यार्थी, कार्यकर्तेव नागरीक यांचा सहभाग, डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

6) तळेगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) – कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

7) धुळे जिल्हा 9 ते 20 ऑगस्ट दरम्यानचे कार्यक्रम- 9 ऑगस्टला संघटना रौप्य वर्षपूर्तीनिमित्त कार्यकर्ता कुटुंब संकल्प मेळावा झाला. 20 ऑगस्ट जिल्हा शाखा स्तरावर प्रचंड निषेध मोर्चाचे आयोजन रौप्य वर्षपूर्ती कुटुंब मेळाव्याचे अध्यक्ष प्रा.भास्कर दरवडे तर प्रमुख वक्ते एम.जी.धिवरे होते. शहीद दाभोलकर, कॉ.शरद पाटील, देशासाठी बलिदान शहीद होणारे लढवय्ये इ.ना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली. चळवळीच्या गीताने सुरवात. पाहुण्यांना कायदा पुस्तिका भेट.

20 ऑगस्ट रोजी प्रथम स्मृतीदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पून प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात काढलेल्या निषेध मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी संघटना, अन्याय अत्याचार निवारण संघटना, सीटू व वैद्यकीय प्रतिनिधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मोराणे खानदेश विकास मंच इ.चा समावेश होता. 1000 ते 1200 विद्यार्थी होते.

शिरपूर (जि. धुळे) – कौटुंबिक मेळावा 3 महाविद्यालयात व्याख्यान, सभासद नोंदणी, चमत्कार सादरीकरण तसेच शिंदखेडा शाखेने सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले.

20 ऑगस्ट रोजी निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल येथील कार्यकर्तेप्रमुख मार्गाने मूक निषेध. मोर्चाचे काळी फिती लावून आयोजन. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदने. शेवटी मोर्चाचे सभेत रूपांतर.

8) नाशिक पंचवटी येथील राष्ट्रीय मजदूर संघ प्रणित रिक्षाचालक-मालक संघटनेने रिक्षाला लावल्या जाणार्‍या लिंबू-मिरचीची प्रथा बंद करण्याची शपथ घेतली. तसेच प्रथम स्मृती दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन व आजचा समाज या विषयावर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा तपास जलद व्हावा म्हणून हुतात्मा स्मारकातून शांतता मोर्चा काढण्यात आला. येवल्यात मानवी साखळी रचण्यात आली. ह्यामध्ये वारकरी पारंपारिक वेषात व वाद्यांसह सामील झाली होती. दाभोलकरांच्या खुन्यांना फाशी द्या असे फलक लावण्यात आले होते. हा मूक मोर्चा तहसील मध्ये पोहोचल्यावर अनेक मान्यवरांची भाषणे झाली व निवेदन देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार सोमनाथ खैरे यांनी निवेदन स्वीकारले.

3) मराठवाडा

1) परभणी मारेकर्‍यांना अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा. तसेच 9 ऑगस्ट रोजी अभिवादन रॅली काढली.

2) औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा, शहरात अभिवादन फेरी. विवेकानंद महाविद्यालयातर्फे डॉ.दाभोलकरांना अभिवादन.

3) परांडा (जि. उस्मानाबाद) – निषेध रॅली, अभिवादन फेरी, भाषणे इ.चा समावेश. वर्तमानपत्रातून चांगले कव्हरेज. प्रा.दीपा सावळे व चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम झाले.

4) मुरूड (जि.लातूर) – यश संगणकशास्त्र महाविद्यालय व यमुनाबाई गोरे अध्यापक महाविद्यालय येथे जादूटोणा विरोधी कायदा-व्याख्यान. डॉक्टरांच्या प्रतिमेस पुष्प व कायदा पुस्तिका अर्पण, प्रमुख ठिकाणी पोस्टर्स लावले. तर 9 ऑगस्ट रोजी जटा निर्मूलनाचा कार्यक्रम जागजी येथे घेतला गेला.

5) बीड 9 ऑगस्ट रौप्यपूर्ती वर्षानिमित्त संकल्प कुटुंब मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी मा.सुभाष वारे व माधव बावगे उपस्थित. पुस्तक विक्री करण्यात आली. पोस्टर प्रदर्शन व 25 वर्षांची वाटचाल सादर करण्यात आली. 20 ऑगस्ट प्रथम स्मृतीदिनानिमित्त निषेध मोर्चा व मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व शाखा, पुरोगामी समविचारी परिवर्तनवादी संघटना, संस्था, शैक्षणिक संस्था सामील झाल्या होत्या. महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ-महिला कला महाविद्यालयाच्या विवेकवाहिनीचा सहभाग.

4) कोकण

1) नवीन पनवेल प्रथम स्मृतीदिनानिमित्त निषेध फेरी, मानवी साखळी, धरणे इ.चे आयोजन. सी.के.टी.कॉलेजच्या विद्यार्थीनींचा सहभाग. ‘विज्ञाननिष्ठ दाभोलकर’ ह्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा.

2) पनवेल (जि.रायगड) – शिवाजी चौकात डॉ.दाभोलकरांना आदरांजली. शाखेतर्फे भूमिका मांडणार्‍या 3000 आवाहन पत्रांचे वाटप.

3) अलिबाग (जि.रायगड) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा कार्यकर्त्यांतर्फे आदरांजली. मानवी साखळी करून निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, विवेकाचा जागर पथनाट्य, संजीव साने यांचा आंदोलनास पाठींबा, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

4) रत्नागिरी साखरपा, ता.संगमेश्वर येथे चौकात बॅनर्स लावून निषेध सभा घेण्यात आली.

5) ठाणे 9 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये डोंबिवली शाखेतर्फे साधनाचे संपादक विनोद शिरसाठ व आय.बी.एन.वाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर यांची भाषणे व चळवळीच्या वाटचालीचे सी.डी.प्रदर्शन. 9 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट कालावधीत रौप्यपूर्ती निमित्त अंनिसचे विविध कार्यक्रम उदा.भाषणे, चमत्कार, सर्प सी.डी.इ.

20 ऑगस्ट रोजी शहापूर-भातसानगर येथे सोमनाथ काबाडी विद्यालयातर्फे निषेध रॅली, ठाणे, भिवंडी, पालघर, डोंबिवली शाखा मुंबई रॅलीत सामील. मोखाडा येथे तहसीलदरांना मुख्यमंत्र्यासाठी निवेदन.

6) मुंबई 9 ऑगस्ट रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे कुटुंब मेळावा. सोनाली कुलकर्णी यांचे भाषण. अविनाश पाटील व माधव बावगे यांची उपस्थिती.

20 ऑगस्ट – ठाणे, मुंबईतील सर्व समविचारींसह कोतवाल गार्डन, दादर येथे अभिवादन जागर. नंतर कोतवाल गार्डन ते चैत्यभूमी धिक्कार रॅली काढण्यात आली. चैत्यभूमीवर रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत. मान्यवरांच्या हस्ते कोलाज, सी.डी.पुस्तक यांचे अनावरण, लिंबू-मिरची सारख्या अंधश्रद्धांचा फोलपणा दाखवण्या आला. तर उमंग गु्रपतर्फे पथनाट्य सादर करण्यात आले. 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

ह्या रॅलीस राष्ट्रसेवादलाचे गजानन खातू, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, युवराज मोहिते, पुष्पाताई भावे, निखील वागळे, अभिनेते संदीप मेहता, सोनाली कुलकर्णी, नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या व अमोल म्हात्रे आदी उपस्थित होते.

7) गोवा एकूण 6कार्यक्रम घेण्यात आले ज्यामध्ये भाषणे व निषेध यांचा समावेश होता.

8) नागोठणे (जि. रायगड) – शाखेतर्फे नागोठणे शहरात धिक्कार रॅली व नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दरेकर मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन. तसेच शिवाजी चौकात जाहीर निषेध करण्यात आला.

5) विदर्भ

1) वर्धा – सर्व पुरोगामी संस्था, संघटना यांच्या साहाय्याने डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली. निषेध फेरीही काढण्यात आली. डॉ.आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी. सामाजिक वनीकरण विभागाने उपलब्ध करून दिलेली बोधी वृक्षाची रोपे ‘नई तालीम’ सेवाग्राम आश्रम शाळेच्या मुलांनी लावली. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

या सर्व कृती कार्यक्रमात किसान अधिकार अभियान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनवादी महिला मंडळ, कामगार आघाडी, रिपब्लिकन आठवले गट इ.संघटना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थिनी व नई तालीम आश्रमशाळेचे विद्यार्थी सहभागी. संयोजन- गजेंद्र सुरकार

2) नागपूर – 9 ऑगस्ट रोजी आम्ही चालवू पुढे हा वारसा : संकल्प कुटुंब मेळावा नागपूर जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आला. सेवादल महिला महाविद्यालयातील सेवादल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ज्ञानेश्वर रक्षक हे प्रमुख पाहुणे होते. जे राष्ट्रसंत तुकडोजी साहित्य संमेलनाचे प्रवर्तक आहेत.

20 ऑगस्ट रोजी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम स्मृतीदिनानिमित्त व्हरायटी चौक येथून अभिवादन फेरी काढण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्तेउमेश चौबे उपस्थित होते. या दिवशी श्री.सिद्धीविनायक पब्लिसिटी तर्फे नाटकाचा प्रयोग करण्यात आला. तसेच दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी विविध संघटनांतर्फे करण्यात आली. टी पॉईंटमार्गेसंविधान चौकात या फेरीचा समारोप झाला. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. अभिवादन फेरीमध्ये अखिल भारतीय अंनिस, रिपब्लिकन पँथर्स, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, भारीप बहुजन महासंघ, मुस्लिम महिला मंच, बुद्धिस्ट रिव्होल्युशनरी फ्रंट, जनसमस्या संघर्ष समिती इ. सहभागी झाले होते.

स्मृतींना उजाळा महाराष्ट्राबाहेर.

1) कर्नाटक

1) फिरा, 2) डी.वाय.एफ.आय., 3) दक्षिण कन्नडा समुदाय, मेंगलोर, 4) एस.एफ.आय., 5) विचारवादी संघ इ.संघटनांमार्फत 20 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन तसेच डॉ. दाभोलकर हुतात्मा दिन म्हणून पाळला गेला. त्यांचे जीवन कार्य भाषणांतून मांडले गेले. सी.बी.आय.च्या अकार्यक्षम कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली गेली. तसेच माजी पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळांनी केलेल्या प्लँचेट प्रकरणावरही टीका झाली.

2) गोवा ए.आय.टी.यु.सी. तर्फे सोमू राव यांनी बिचोली, गोवा येथे चमत्कार प्रात्यक्षिके वसुधा सवाईकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकानेावर भाष्य केले तर विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान तर्फे श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर डॉ.रूपेश पाटकर यांचे व्याख्यान झाले.

3) केरळ ‘युक्तीवादी फोरम’तर्फे म.अं.नि.स.च्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम. ‘केरळ फ्री थिंकर्स’ फोरम तर्फे 24 ऑगस्ट त्रिचूर येथे राज्य स्तरीय दाभोलकर मेमोरियल सेमिनारचे आयोजन. विविध ठिकाणी निदर्शने केली गेली. ‘केरळ शास्त्र साहित्य परिषदे’तर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन मोहिमेचे उद्घाटन व अंधश्रद्धाविरोधी कायद्याची मागणी. तिरूवनंतपुरम येथे वैज्ञानिक दृष्टिकोन मोहिमे अंतर्गत कायदा मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 23/24 ऑगस्ट रोजी पलक्कड येथे ‘रिसोर्स पर्सन’ साठी कार्यशाळेचे आायोजन.

4) पंजाब तर्कशील सोसायटीतर्फे सेमिनारचे आयोजन. विषय ‘फासीवाद का बढ रहा रूझान’.

5) ओडिसा – त्रैमासिक जनरल मधून डॉ.दाभोलकरांवर लेख प्रसिद्ध. ओडिसा रॅशनॅलिस्ट असोसिएशनतर्फे हे त्रैमासिक प्रसिद्ध होते. ए.एम.ओ.एफ.ओ.आय.ह्या विवेकी संघटनेतर्फे भुवेनश्वर येथे ज्ञानेश्वर शाहू यांचे भाषण समविचारींतर्फे डॉ.दाभोलकरांना आदरांजली.

-सुशिला मुंडे

संपर्क : 9404870434