सातार्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या सोनगाव या गावातील एका महिलेच्या आठ वर्षांपासून वाढलेल्या अत्यंत जटील अशा जटा न कापता सोडवण्याचे अवघड काम चार तासांच्या अथक परिश्रमाने अंनिस व विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केले. डॉ.दाभोलकरांच्या पुस्तकातील एका उल्लेखानुसार ‘केसांतील गुंता तर सोडवायचाच, पण त्याचबरोबर मनातला अंधश्रद्धेचा गुंताही दूर करायचा हाच जटा निर्मूलनाच्या कामाचा खरा गाभा आहे’ त्यांच्या याच विचारांचा वारसा अंनिस कार्यकर्ते पुढे नेत आहेत. या मोहिमेत जटा निर्मूलन तज्ञ डॉ.सुधीर कुंभार-कराड, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, वसिम बागवान, वैशाली जांभळे व विवेकवाहिनीच्या विद्यार्थींनी संध्या जाधव, सुजाता भिलारे, छकूताई देडे व कोमल घाडगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
–प्रशांत पोतदार, सातारा