Categories
अभियान

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी तरूण वारकर्‍यांची ‘विवेकवारी’

जानेवारी - २०१४


डॉ.सदानंद मोरे, वाभळे महाराज व महाराष्ट्रातील विवेकी संत सुधारक साथी यांनी जादूटोणा विरोधी कायदा हा संताचा वारसा पुढे नेणारे पाऊल आहे अशी भूमिका घेतली. त्यांनी वारकर्‍यांना फितवणार्‍या सनातनी शक्तींच्या विरोधी भूमिकेचा समाचार घेऊन सरकारचे व जनसामान्यांचे यशस्वी प्रबोधन केले.
तरूण युवा कीर्तनकार सचिन पवार, हनुमंत पवार, गणेश दळवी, सचिन गोरडे,
मधुकर भोसले, सपना कंदले, सोमेश गिते, विठ्ठल कदम, सुशील शिंदे, इम्रान शेख, कुणाल गायकवाड,विक्रम राजेभोसले,सागर शेलार,दिपाली अवकाळे, सुदाम सानप व सतीश देशपांडे या सर्वांनी कीर्तनाद्वारे महाराष्ट्रात विवेकवारी यशस्वी केली. सनातन्यांच्या धमक्यांना न घाबरता आम्ही वारकरी आहोत म्हणून आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत अशी खंबीर भूमिका घेऊन डॉ. सदानंद मोरे यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली कायद्याला समर्थन दिले.
ज्ञानेश्वर-तुकारामचा वारसा खर्‍या अर्थाने पुढे नेण्यास मदत करणार्‍या या सर्व संतसज्जनाची महाराष्ट्र अंनिस मन:पूर्वक कृतज्ञ आहे.