Categories
चळवळ

इस्लामपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

जुलै - २०१३

पहिले अंधश्रद्धा निर्मूलनाचे साहित्य संमेलन 7 जुलैला आकुर्डीत-

            समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त पहिले अंधश्रद्धा निर्मूलनाचे साहित्य संमेलन दि.7 जुलै 2013 रोजी आयोजित करीत आहे. संत व समाजसुधारकांचा वारसा सांगणार्‍या महाराष्ट्र अंनिसच्या सातत्यपूर्ण-संघटीत कामामुळे अंधश्रद्धा निर्मूलन विचार कथा, कविता, कादंबरी, नाटक सिनेमा अशा विविध साहित्यिक-सांस्कृतिक माध्यमातून व्यक्त होत आहे. ही चांगली बाब आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचे पहिले साहित्य संमेलन आयोजित करीत असून त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक लेखक उत्तम कांबळे व उद्घाटक म्हणून अ.भा.साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.नागनाथ कोतापल्ले असणार आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सर्प विज्ञान प्रबोधन –

            नागपंचमीच्या निमित्ताने 1 ते 15 ऑगस्ट 2013 दरम्यान राज्यभरातील सर्प तज्ञांच्या सहकार्याने समिती ‘सर्प विज्ञान प्रबोधन सप्ताह’ साजरा करणार आहे. त्यामध्ये निसर्ग साखळीतील महत्वपूर्ण घटक असणार्‍या ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ असे प्रबोधन चित्रफीत, पोस्टर प्रदर्शन आदी माध्यमातून शाळा, महाविद्यालये व गाव-कॉलनी-वस्त्यांमधून जनजागरण केले जाणार आहे.

            महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणार्‍या गणेशोत्सवामध्ये निर्माल्य व मूर्ती विसर्जनामुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायलय, राज्याचे पर्यावरण मंत्रालयामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानांनुसार प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी यासासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले आहे.  त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणण्यावर बंदी आणण्याचा ठराव करण्यात यावा असा प्रयत्न राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आदी ठिकाणी प्रयत्न करण्याचे ठरले आहे. तसेच विषारी रासायनिक रंगाच्या वापरावर बंदी आणावी व शाडूच्या मूर्ती बनविण्याला प्रोत्साहन द्यावे यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री संजय देवतळेंनी कार्यवाही करावी असा प्रयत्न केला जाणार आहे.

पुढील दशकातील कार्यक्रम-मानसमित्र आणि जोडीदाराची विवेकी निवड –

            जागतिकीकरणामुळे बदलत्या चंगळवादी स्पर्धा, गतिमान जीवनामुळे निर्माण होणार्‍या अस्वस्थ व निराश होण्याच्या मानसिकतेला सामोरे जाण्यासाठी ‘मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम’ समितीतर्फे राबविली जाणार आहे. त्यामध्ये समाजात याबद्दलचे प्रबोधन व भावनिक समुपदेशन करून लोकांना अंधश्रद्ध उपचारांपासून परावृत्त करून शास्त्रीय उपचाराकडे वळविण्याचा प्रयत्न समिती करणार आहे. त्यासाठीचे एक प्रायोगिक केंद्र चाळीसगाव येथे उभारण्यात आले असून जळगावचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येत आहे. नवीन इच्छुकांसाठी ‘मानस मित्र’ प्रशिक्षण सातारा येथे पुढील वर्षात घेतले जाणार आहे.

            जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियांनातर्गत विवाह उत्सुक युवक-युवतींशी व त्यांच्या पालकांशी प्रबोधनाचा संवाद केला जात आहे. त्यासाठी आवश्यक प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे. त्याबाबतचे मार्गदर्शक पुस्तक मोठ्या प्रमाणात राज्यभरात वितरीत केले जाणार असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त सहकार्याने व्याख्याने, कार्यशाळा, संकल्प मेळावे राज्याच्या जिल्हा व विद्यापीठनिहाय घेतले जाणार आहेत. त्यासोबत जात निर्मूलनासाठी आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह घडवून आणायला प्रोत्साहन, सहकार्य देण्याचे काम समितीतर्फे केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या महसूलविभागनिहाय जोडीदाराच्या विवेकी निवडीचे मार्गदर्शन व सल्ला केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

            महाराष्ट्र अंनिसतर्फे सुधाकर आठल्येंच्या उदार देणगीच्या सहकार्याने पहिला उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार अलका चाफेकर(मुंबई) आणि पहिला उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार प्रा.विजयकुमार जोखे(शिराळा, जि.सांगली) यांना सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान केला गेला.

            इस्लामपूर येथील राज्य प्रतिनिधी परिषदेला महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री नामदार जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी आणि डॉ.जब्बार पटेल व अच्युत गोडबोले यांनी सदिच्छा भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज केले. महाराष्ट्र अंनिसच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी निवडीचे काम राज्याच्या सहमती समितीतील डॉ.नरेंद्र दाभोलकर, प्रा.प.रा.आर्डे व कुमार मंडपे यांनी केले. इस्लामपूर येथील चारदिवशीय राज्य प्रतिनिधी परिषदेचे संयोजन इस्लामपूर शाखेतर्फे मोठ्या उत्साहात करण्यात आले. त्यासाठी राज्य सरचिटणीस संजय बनसोडे व राज्य कार्यवाह प्रा.डॉ.नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य प्रतिनिधी परिषद 6 ते 9 जून 2013 रोजी इस्लामपूर, जि.सांगली येथे संपन्न झाली. राज्याच्या 30 जिल्ह्यांतून आलेल्या 150 प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समितीची पुढील तीन वर्षांसाठीची राज्य कार्यकारिणी निवड सहमतीने करण्यात आली. त्यामध्ये राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. तर राज्य कार्याध्यक्षपदी पुन्हा अविनाश पाटील(धुळे) यांची निवड करण्यात आली असे समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. समिती आता जादूटोणा विरोधी कायदा मंजुरीसाठीचा पाठपुरावा अभिनव पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी 

सन 2013 ते 2016 कालावधीसाठी 

*राज्य अध्यक्ष : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

*राज्य उपाध्यक्ष

1.मराठवाडा : प्राचार्य अनिरुद्ध जाधव (लातूर)
2.विदर्भ : विजय सालंकार (नागपूर)
3.खान्देश : डॉ. रविंद्रनाथ टोणगावकर (दोंडाईचा, धुळे)
4.कोकण : डॉ. प्रदीप पाटकर (पनवेल)
5.दक्षिण महाराष्ट्र : प्रा. तारा भवाळकर (सांगली)
6.पश्चिम महाराष्ट्र : अशोक धिवरे (पुणे)

*राज्य कार्याध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)

*राज्य प्रधान सचिव : सुशीला मुंडे (डोंबिवली), मिलिंद देशमुख (पुणे), माधव बावगे (लातूर)

*राज्य कार्यकारी समिती-राज्य सरचिटणीस
1.मराठवाडा : शहाजी भोसले (औरंगाबाद),रामकुमार रायवाडीकर(लातूर), प्रा. डॉ. शिवदास हमंद (नांदेड)
2.खान्देश : विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकेसन गोराणे (नाशिक)
3.पश्चिम दक्षिण महाराष्ट्र : संजय बनसोडे (इस्लामपूर), प्रशांत पोतदार (सातारा)
4.कोकण : नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई), नितीन राऊत (अलिबाग)
5.विदर्भ : गजेंद्र सुरकार (वर्धा), प्रा. नरेश आंबिलकर (भंडारा)


*बुवाबाजी संघर्ष विभाग
राज्य कार्यवाह : अ‍ॅड. रमेश महाजन (पुणे)
राज्य सहकार्यवाह : सुनील वाघमोडे (चाळीसगाव)
सदस्य : अ‍ॅड. गोविंद पाटील (सोलापूर),

*विविध उपक्रम विभाग
राज्य कार्यवाह : प्रा. डॉ. नितीन शिंदे (इस्लामपूर)
राज्य सहकार्यवाह : दिलीप आरळीकर (लातूर)
सदस्य : धर्मराज चवरे (मोहोळ)

*वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प
राज्य कार्यवाह : प्रा. प्रभाताई पुरोहित (मुंबई)
राज्य सहकार्यवाह : गिरीश ढोक (माळीनगर, सोलापूर), ए.ओ. पाटील (धुळे)

*प्रशिक्षण विभाग
राज्य कार्यवाह : प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरीया (पुणे)
राज्य सहकार्यवाह : निशा भोसले (सोलापूर)

*दस्तऐवज संकलन
राज्य कार्यवाह : उषा शहा (सोलापूर)
राज्य सहकार्यवाह : हर्षल लवंगारे (पुणे)

*प्रकाशन वितरण विभाग
राज्य कार्यवाह : प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे (डोंबिवली)
राज्य सहकार्यवाह : निलेश घरत (अलिबाग)

*निधी व्यवस्थापन विभाग
राज्य कार्यवाह : सुधीर निंबाळकर (ठाणे)
राज्य सहकार्यवाह :

*सांस्कृतिक विभाग
राज्य कार्यवाह : एस. एस. शिंदे (डोंबिवली)
राज्य सहकार्यवाह : प्रा. योगेश कुदळे (इस्लामपूर)

*महिला सहभाग विभाग
राज्य कार्यवाह:प्राचार्या सविता शेट्ये (बीड)
राज्य सहकार्यवाह : आरती नाईक (पनवेल)

*युवा सहभाग विभाग
राज्य कार्यवाह : कृष्णात कोरे (कोल्हापूर)
राज्य सहकार्यवाह : स्वानंदी वडगावकर (उस्मानाबाद-पुणे)

*राष्ट्रीय अनुसंधान विभाग
राज्य कार्यवाह : प्रा. डॉ. सुदेश घोडेराव (नाशिक)
राज्य सहकार्यवाह : माणिक पवार (पुणे)

*वार्तापत्र व्यवस्थापन विभाग
राज्य कार्यवाह : गणेश चिंचोले (डोंबिवली)
राज्य सहकार्यवाह : प्रकाश डब्बावार (यवतमाळ)

*संकेतस्थळ व्यवस्थापन-संपादन : प्रा. अदिती मुळ्ये (रत्नागिरी)

*विचार कृती पत्रिका-संपादन : प्रा. परेश शहा (शिंदखेडा)

*वार्तापत्र संपादक मंडळ : प्रा. प.रा. आर्डे(सांगली), राजीव देशपांडे (बेलापूर, नवी मुंबई), डॉ. आशुतोष मुळ्ये (रत्नागिरी)

*मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम प्रमुख - डॉ. प्रदीप जोशी (जळगांव)

*निमंत्रित सदस्य : शालिनीताई ओक (सोलापूर), अनंत लिमये (पुणे), नीता सामंत (चाळीसगाव), डॉ. शाम महाजन (औरंगाबाद), दिपक गिरमे (पुणे), अरविंद पाखले (पिंपरी चिंचवड), डॉ. हमीद दाभोलकर (सातारा), प्रा. गोपाळ नेवे (चाळीसगांव)
राज्य कार्यकारणी निवड समिती सहमती

डॉ. नरेंद्र दाभोलकर
संस्थापक कार्याध्यक्ष

प्रा.प.रा.आर्डे
संपादक, वार्तापत्र

कुमार मंडपे
जेष्ठ कार्यकर्ते