Categories
जट निर्मूलन

अश्विनी आणि उज्वला झाल्या जटामुक्त!

फेब्रुवारी – २०१३

कासेगाव ता. वाळवा जि. सांगली येथील सौ. अश्विनी रामचंद्र आडके (वय 25) या कष्टकरी महिलेचे जटा निर्मूलन करण्यास इस्लामपूर शाखेला यश आले. गावातील अंगणवाडी शिक्षिका सौ. शितल विजय कांबळे यांनी या जटा निर्मूलनासाठी पुढाकार घेतला होता. गेली पंधरा वर्षे अश्विनी हिच्या डोक्यावर जटांचे ओझे झाले होते. देवीच्या भीतीने या जटा दिवसेंदिवस वाढतच होत्या.  शितल कांबळे यांनी अश्विनीचे प्रबोधन करून तिला जटा निर्मूलनासाठी तयार केले. अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, डॉ.नितीन शिंदे, महेश परांजपे, सचिन कांबळे, अरविंद पन्हाळे, विजय कांबळे यांनी सदर महिलेचे जटा निर्मूलन केले.

शिगांव तालुका वाळवा येथील दानशूर बाळकृष्णकाका पाटील माध्यमिक विद्यालयातील इ. 6 वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. उज्वला सर्जेराव मदने हिचे जटानिर्मूलन करण्यास इस्लामपूर शाखेस यश मिळाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एम. बी. कचरे, शिक्षक बाजीराव पाटील, पी. बी.पाटील, अधिक वड्ड यांनी उज्वला हिचे जटा निर्मूलनासाठी मतपरिवर्तन केले. संजय बनसोडे, नितीन शिंदे, राजेंद्र मोटे, प्रा. होनमोरे, जालींदर आडके, विकास पाटील यांनी जटा निर्मूलन केले. जटा निर्मूलन केलेल्या महिलांना अंनिस इस्लामपूरकडून कपडे व पुस्तके भेट देण्यात आली.

– संजय बनसोडे, इस्लामपूर