महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंंपरी चिंचवड शाखेने चालविलेले संत श्रेष्ठ गाडगेबाबा वाचनालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कायमस्वरूपी शॉप नं. 06,सद्गुरू अपार्टमेंट, पी.सी.एम.सी. हॉस्पीटलजवळ, मेंन रोड आकुर्डी, आकुर्डी, पुणे 411035 उपलब्ध झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर शाखेने सदर संत गाडगेबाबा वाचनालयाचे औपचारिक उद्घाटन दि. 09/07/2011 रोजी डॉ. सुहास माटे यांच्या हस्ते आयोजित केले होते. शाखेचे सर्वच कार्यकर्तेआणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी वाचनाचे महत्व आणि वाचन कशाप्रकारे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. माटे यांनी वाचनालयासाठी दि. 1 सप्टेंबर 2011 रोजी कपाट आणि पुस्तके देण्याचे आश्वासन दिले,तसेच डॉ. माटे यांच्या हस्ते बेटी बचाव या अभियानाचे उद्घाटन फ्लेक्स द्वारे करण्यात आले. सदरचे बेटी बचाव अभियानाचे फलक विविध संस्थांच्या व व्यवस्थापनांच्या पुरस्कृत प्रित्यर्थ तयार करून शहराच्या विविध चौकात व सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे. शाखा अध्यक्ष मा. दिनकर साळुंखे यांनी कोणत्याही कार्यक्रमास जाताना पुस्तक रूपी भेट देण्याबाबत उपस्थित लोकांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारी, सूत्र संचालन म.अंनिस पिपरी-चिंचवड शहर शाखेचे युवा कार्यवाह स्वप्निल वाळुंज यांनी केले.कार्यक्रमास आलेल्या कार्यकर्त्याचे व नागरिकांचे आभार डॉ. मुनेश्वर यांनी केले. तसेच शाखेचे कार्यकर्ते रविंद्र बोर्लीकर, यांचा वाढदिवस असल्याने सर्व कार्यकर्तेव नागरिक यांचा छोटा स्नेह मेळावा साजरा करण्यात आला. तसेच मा. रविंद्र बोर्लीकर यांनी आपल्या वाढदिवसा बद्दल वाचनालयास 15 दुर्मिळ वाचनीय पुस्तके भेट दिली. मा. दिलीप कामत यांनी त्यांना मिळालेल्या अंनिस समर्पित कार्यकर्ता पुरस्काराची रक्कम पुस्तकांसाठी रू. 1000/- देणगी दिले,
–स्वप्निल वाळुंज म.अंनिस पिपरी-चिंचवड