भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौक, भंडारा व पोलीस स्टेशन पालांदूरच्या सहकार्याने पालांदूर येथे 31 डिसेंबरला ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा शहरातील जिल्हाधिकारी चौकात दुधाचे वाटप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. लाखांदूर येथील मअंनिसचे कार्यकर्तेशाहीर प्रकाश नाकतोडे व त्यांच्या संचामार्फत व्यसनविरोधी पोवाडा, प्रबोधनात्मक गीत व चळवळींची गाणी सादर करण्यात आली. याप्रसंगी हर्षल मेश्राम, प्रा. नरेश आंबीलकर, विष्णुदास लोणारे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम कोणते होतात, हे सांगितले. यानंतर मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी, भंडारा यांचे मार्फत निवेदन देऊन 31 डिसेंबर हा दिवस ‘व्यसनमुक्ती दिवस’ म्हणून घोषित करण्याचे व महाराष्ट्र राज्यात दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली.
पालांदूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस स्टेशन, जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालांदूरच्या वतीने बाजार चौकात ‘दारू नको, दूध प्या’ अशा विविध घोषणा देत ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम साळी, ठाणेदार अंबादास शुनगार, कार्याध्यक्ष प्रा. युवराज खोब्रागडे, प्रा. विलास लांजेवार, सुधाकर ढोगे, भरत खंडाईत, दामाजी खंडाईत, सरपंच हेमराज कापसे, इद्रिस लद्दानी, दिलीप बडोले; तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– विष्णुदास लोणारे, भंडारा