Categories
उपक्रम

होळी अशी साजरी करावी

मार्च - २०११

आपल्या हिंदू धर्मात फाल्गुन पौर्णिमेदिवशी अग्नीची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यासाठी आपण होळी करतो. होळी करण्यासाठी शेणाच्या शेणकुटाचा आणि लाकडाचा(जळणाचा)वापर करतो.  ‘ते आपण वाचवले पाहिजे.’ जळण वाचलं तर झाड वाचेल, झाड वाचले तर पाऊस पडेल, मानवास ऑक्सिजन मिळेल त्याचबरोबर हवेचे प्रदूषण कमी होईल. शेण वाचलं तर त्याचा खतासाठी वापर करण्यात येईल आणि ते शेण(खत) पिकासाठी वापरले तर धान्याचे उत्पादन वाढेल. तरी होळी करण्यासाठी जळणाचा आणि शेणकुटाचा वापर न करता एक आरती घ्यावी व त्याच गोडेतेल घालावे व त्यात कापसाची वात घालून ती आरती पाटावर रांगोळी काढून ठेवावी आणि ती वात पेटवावी त्यामुळे अग्नी तयार होईल. त्या अग्नीची पूजा अर्चा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांनी नमस्कार करायचा. अशा पद्धतीचे 19 मार्च रोजी होळीचा सण साजरा करावा, ही नम्र विनंती.            

मकरंद म्हेत्रेविटा, जि.सांगली.

होळी लहान करा : पोळी दान करा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 10 वर्षे होळी लहान करा : पोळी दान करा ही मोहिम राबवित आहे. यावर्षी 19 मार्चला होळी आहे. अंनिसच्या सर्व शाखांनी यादिवशी आपल्या परिसरातील लोकांना होळी लहान करण्याचे, कचर्‍याची होळी करण्याचे, दुर्गुणांची होळी करण्याचे आवाहन करावे. होळीमध्ये नैवेद्य म्हणून टाकली जाणारी पोळी दान म्हणून स्विकारावी व ती पोळी गरीब गरजूंना वाटप करण्याचे नियोजन करावे.