अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या पाचव्या सत्रात मासिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणार्या ‘अंनिस कार्यकर्त्यां’चा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ‘अंनिवा’चे ज्येष्ठ लेखक आणि जुन्या-नव्या संपादक मंडळाच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यासाठी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. प्रदीप पाटकर, ‘अंनिवा’चे संपादक प. रा. आर्डे, सुनीलकुमार लवटे, प्रभाकर नानावटी, कुमार मंडपे, शरद अभ्यंकर, डॉ. नितीन शिंदे आणि मच्छिंद्रनाथ मुंडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या सत्राच्या सुरुवातीस अंनिस इस्लामपूर शाखेने ‘जिंदगी मौत ना बन जाए’ हे गाणे गाऊन उपस्थितांना भारावून सोडले.
‘अंनिवा’चे संपादक प. रा. आर्डे यांनी या सोहळ्याच्या प्रास्ताविकात थोडक्यात ‘अंनिवा’ची वाटचाल आणि त्याच्या वाढीसाठी हरेक कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान नमूद करून कृतज्ञता व्यक्त केली. आताच्या ‘अंंनिवा’चे हे सामर्थ्य – वैभव हे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांने घेतलेल्या कष्टातून साकारले आहे. म्हणून या सांघिक विजयाबद्दल शतकवीर कार्यकर्ते, मासिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सर्व ‘आधारस्तंभ’ ‘अंनिवा’च्या वाढीसाठी झटणारे लेखक व जुने-नवे संपादक यांचा गौरव करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

* जुन्या–नव्या संपादकांचा सत्कार
1) उल्हास ठाकूर – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
2) अलका जोशी – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
3) डॉ. प्रदीप पाटकर – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
4) उज्ज्वला परांजपे – सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते
5) मिलिंद जोशी – सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते
6) मुक्ता दाभोलकर – सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते
7) उमेश सूर्यवंशी – सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते
8) सुहास पवार – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
9) राहुल थोरात – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
10) सुहास यरोडकर – डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते
* ‘अंनिवा’तील निवडक लेखांच्या खंडांच्या संपादकांचा सत्कार
1) प्रभाकर नानावटी – डॉ. आ. ह. साळुंखे
2) राजीव देशपांडे – डॉ. आ. ह. साळुंखे
* ज्येष्ठ लेखक सत्कार
1) शरद अभ्यंकर – डॉ. आ. ह. साळुंखे
2) कुमार मंडपे – प्रदीप पाटकर
3) एस. एस. शिंदे – डॉ. आ. ह. साळुंखे
4) मच्छिंद्रनाथ मुंडे – डॉ. आ. ह. साळुंखे
5) अनिल चव्हाण – सुनीलकुमार लवटे
6) डॉ. नितीन शिंदे – सुनीलकुमार लवटे यांचे हस्ते
7) प्रा. जगदीश आवटे – सुनीलकुमार लवटे यांचे हस्ते
सुरुवातीपासूनच ‘अंनिवा’मध्ये दर्जेदार लेख लिहून विवेकाचा जागर करणार्या लेखकांच्या सत्कारानंतर काही लेखकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कुमार मंडपे यांनी काही किस्से नमूद करून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीतून कशाप्रकारे हे मासिक मोठे होत गेले, याचा ऊहापोह केला.
शाहीर एस.एस.शिंदे यांनी डॉ.दाभोलकरांमुळेच गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना व्यक्त करून मनापासून आभार व्यक्त केले. अलका जोशी आपल्या मनोगतात म्हणाल्या की, धर्मचिकित्सेचं मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे ठाकले आहे. ते आव्हान पेलण्याचे काम सातत्याने या मासिकाने केले आहे. इथून पुढेही विवेकाचा आवाज बुलंद होतच राहील.” शरद अभ्यंकर यांनी थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
यानंतर ‘अंनिवा’ मासिकाचे शंभर वर्गणीदार करणार्या कार्यकर्त्यांचा; तसेच ‘अंनिवा’साठी जाहिराती मिळवून पाठीशी खंबीरपणे आधार देणार्या हितचिंतकांचा, कार्यकर्त्यांचाही ‘कृतज्ञता’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघसेन जगतकर, मिनाज लाटकर आणि राहुल थोरात यांनी केले, तर या सोहळ्याचे आभार उमेश सूर्यवंशी यांनी मानले.