Categories
जट निर्मूलन

इस्लामपूर येथे महिलेचे जटा निर्मूलन

ऑगस्ट - २०१६

इस्लामपूर (जि. सांगली) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना जटा निर्मूलन करण्यात यश आले आहे. सौ. उज्ज्वला सचिन सावंत (वय 30, रा. शनिवार पेठ, कराड) यांच्या गेल्या तीन-चार वर्षांपासून जटा वाढलेल्या होत्या. सौ. उज्ज्वला यांच्या सुमारे तीन फूट लांबीच्या जटा होत्या. अज्ञान, भीती यामुळे त्या जटा वाढतच होत्या, त्याचा त्रासही त्यांना जाणवत होत्या. देवाची जट कशी काढायची, याची प्रचंड भीती त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होती. म.अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांनी सौ. उज्ज्वला व त्यांच्या कुटुंबियांचे प्रबोधन केले. सौ. उज्ज्वला यांच्या माहेरी (ता. कराड) येथे त्यांचे जटानिर्मूलन केले. ओंड गावचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत वसंतराव थोरात (दादा) यांच्या सहकार्याने या कामी यश आले. म.अं.नि.स.चे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. नितीन शिंदे, इस्लामपूर कार्याध्यक्ष प्रा. विष्णू होनमोरे, राजेंद्र मोटे यांनी जटा निर्मूलन केले. यावेळी प्रा. प्रवीण लादे, संभाजी पवार, सौ. मंगल पवार, संकेत मोटे उपस्थित होते. अंधश्रद्धेची मानसिक गुलामी, अज्ञानातून, अंधश्रद्धेतून जटा वाढविल्या जातात. आपल्या परिसरात अशा जटाधारी व्यक्ती असल्यास म.अं.नि.स.ला कळवावे, असे आवाहन केले आहे.

संपर्क : 9421226926

प्रा. विष्णू होनमोरे, इस्लामपूर