Categories
व्यसन

करमाळ्यात व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन

जानेवारी - २०१८

अंनिस करमाळा शाखेच्या वतीने ३१ डिसेंबरला व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये एन.सी.सी. व एन.एस.एस. विद्यार्थी; तसेच अ‍ॅकॅडमी झरेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वत: तीन टेम्पो करून रॅलीसाठी करमाळ्यात आले होते. वाय.सी.एम. कॉलेजचे उपप्राचार्य संभाजीराव किर्दक यांनी एन.सी.सी.चे विद्यार्थी गणवेषात उपस्थित केले; तर प्रा. लक्ष्मण राख सर एन.एस.एस.चे विद्यार्थी हलगी वादकासह सहभागी केले होते. झरे येथील अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी ड्रेसकोडसह रॅलीत सहभागी असल्याने रॅलीला एक वेगळेच स्वरूप निर्माण झाले. या सर्वांच्या पाठीमागे मान्यवरांसह ४०० मोटारसायकलस्वार रॅलीत सामील झाले होते. रॅलीतील विद्यार्थी व मोटारसायकलस्वार हे ‘दारू नको; दूध प्या, चला व्यसनाला बदनाम करू या’ अशा घोषणा देत त्यांनी शहर दणाणून सोडले होते. प्रथमच केलेला हा प्रयोग अतिशय नेटका व चांगला झाल्याने या उपक्रमाबाबत शहरातील जाणकारांनी कौतुक केले. व्यसनमुक्त संघाचे जिल्ह्याचे समन्वयक नीलकंठ ताकमोगे यांनी सदर रॅलीसाठी मसाला दूध देण्याची इच्छा व्यक्त केली, त्याप्रमाणे त्यांनी नियोजनही केले.
रॅलीचे खास आकर्षण ठरले ते अंनिसचे जिल्हा व्यसनमुक्त कार्यवाह व्ही. आर. गायकवाड. त्यांनी ‘दारू नको दूध प्या…’ व ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ असा आगळ्यावेगळ्या प्रकारचा फलक आपल्या मोटारसायकलला लावलेला होता. फलकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. रॅलीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर व लोकविकास डेअरीचे चेअरमन दीपक आबा देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार घालून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. कार्यक्रम समारोपप्रसंगी व्यसनमुक्त संघटनेचे प्रणेते अ‍ॅड. बाबूराव हिरडे यांनी ‘व्यसनाधिनतेचे परिणाम’ आणि ‘व्यसनमुक्ती’ याविषयी प्रबोधन केले.
प्रास्ताविक व्ही. आर. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण राख यांनी केले. आभार अनिल माने यांनी मानले. उपस्थितांचे स्वागत डी. जी. पाखरे, अ‍ॅड. सचिन हिरडे, ज्ञानदेव सातव, संतोष माने, राजेंद्र साने, वैशाली महाजन, गायकवाड मॅडम, सोनवणे मॅडम, सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, गजेंद्र पोळ, बाळासाहेब दुधे, प्रशांत नाईकनवरे, संजय हंडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आकाश मंगवडे, दादा दळवी, अण्णा काळे, दीपक राखुंडे, हरिभाऊ पिंपळे, रघुनाथ गाडेकर (सर), रईस शेख, शरद हिरडे, गणेश ढवळे, सारंग परदेशी, तात्या हिरडे, नीलकंठ ताकमोगे, संजय बापू घोलप, सुजित बागल, संभाजी किर्दक, मेजर सोंडकर, सुरेश कोळी, सुहास एकाड यांनी परिश्रम घेतले.
-व्ही. आर. गायकवाड, करमाळा, जि.सोलापूर.