Categories
अभियान

‘चलो दिल्ली! चलो पुणे!’ ‘हिंसा के खिलाफ.. मानवता की ओर!’

देशव्यापी प्रबोधन अभियान
जुलै - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी पक्ष, संघटना, संस्था व गट यांच्या सहभागाने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तिसर्‍या स्मृतीदिनानिमित्त ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2016 च्या दरम्यान हे अभियान संपन्न होईल. अभियानाची सुरुवात 20 जुलैला दिल्ली येथे होईल. तर समारोप 20 ऑगस्टला पुण्यात होईल. या अभियानात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा.

सन्माननीय सजग नागरीक बंधू-भगिनींनो,

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला येत्या 20 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण होत आहेत, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला 18 महिने होत आहेत. या दोन्ही खुनांच्या तपासात शासनाने अक्षम्य दिरंगाई दाखविली आहे. मागील काही दिवसांत सी.बी.आय.मुळे डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणात सनातन संस्था व हिंदू जनजागरण समिती यांचे साधक संशयित म्हणून पुढे आले आहेत; परंतु अजूनही दोन्ही खुनांचे मुख्य सूत्रधार याला अटक होणे बाकी आहे. या सर्व दिरंगाई व असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे देशव्यापी प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे. आपण खालील प्रकारे या प्रबोधन अभियानात सहभागी होऊ शकता.

1) मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ‘दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना व सूत्रधारांना कधी पकडणार?’ अशा आशयाचे पत्र पाठवून विचारणा करू शकता किंवा निषेध करू शकता.

2) खुनाच्या तपासातील संशयित साधक व धर्माच्या नावाखाली देशद्रोही कारवाया करणार्‍या सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीबद्दल शासनाने भूमिका जाहीर करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी करू शकता.

आपले विनीत

प्रा. डॉ. एन. डी. पाटील

राज्याध्यक्ष

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष