Categories
उपक्रम

‘जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा!

ऑगस्ट - २०१७

डॉ. दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त अंनिसचा लघुपट महोत्सव

जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव – 2017’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये पुढील विषयावर लघुपट, माहितीपट व अ‍ॅनिमेशनपट बनविण्याकरिता आयोजित स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

स्पर्धेचा विषय : जातिप्रथा (Caste)

सहभाग श्रेणी :

1) खुला गट : सर्व वयोगटाकरिता खुला असेल.

2) विद्यार्थी गट : विद्यार्थी गटात सहभाग नोंदविणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र व शैक्षणिक संस्थेचे पत्र सादर करणे अनिवार्य आहे.

3) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता गट : अंनिस कार्यकर्त्यांना आपल्या संबंधित शाखेच्या कार्याध्यक्षांच्या स्वाक्षरीचे पत्र देणे आवश्यक आहे.

पारितोषिके :

1) श्रीराम लागू सर्वोत्कृष्ट लघुपट (खुली श्रेणी) – रुपये 25,000/- व स्मृतिचिन्ह

2) निळूभाऊ फुले सर्वोत्कृष्ट लघुपट (विद्यार्थी श्रेणी) – रुपये 15,000/- व स्मृतिचिन्ह.

3) सदाशिव अमरापूरकर सर्वोत्कृष्ट लघुपट (म.अं.नि.स. कार्यकर्ता श्रेणी) – रुपये 5,000/- व स्मृतिचिन्ह

4) राम नगरकर सर्वोत्कृष्ट माहितीपट (विद्यार्थी श्रेणी) – रुपये 10,000/- व स्मृतिचिन्ह.

5) सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट – रुपये 10,000/- व स्मृतिचिन्ह.

निवड झालेल्या 30 कलाकृतींना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

नियम व अटी :

1) स्पर्धकांच्या सहभागासाठी येणार्‍या लघुपट, माहितीपट व अ‍ॅनिमेशनपट यांची लांबी शीर्षकासह 10 मिनिटांपेक्षा अधिक नसावी. 2) लघुपट, माहितीपट आणि अ‍ॅनिमेशनपट याकरिता कोणत्याही भाषेचे बंधन नाही, तरी इंग्रजी उपशीर्षके असणे गरजेचे आहे. 3) स्पर्धकांनी आपली कलाकृती ही डी.व्ही.डी.च्या दोन प्रतीमध्ये पाठवणे बंधनकारक आहे. 4) दोन्ही डी.व्ही.डी.वर लघुपटाचे नाव, सहभाग, श्रेणी, लघुपटाचा कालावधी, दिग्दर्शकाचे नाव असणे आवश्यक आहे. 5) डी.व्ही.डी सोबत लघुपटाचे पोस्टर, फोटो, कलाकृतीचा सारांश, दिग्दर्शकांची माहिती जोडावी. 6) कलाकृतीच्या डी.व्ही.डी.सोबत सहभाग अर्ज व ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 7) प्रत्येक स्वतंत्र कलाकृतीकरिता स्वतंत्र सहभाग शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. 8) कलाकृती निवडीचा अथवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार हा विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव निवड समितीचा असेल, त्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नसेल.

– योगेश कुदळे