Categories
निवेदन

धुळ्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन

जानेवारी - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गठित झालेल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे वतीने धुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र 2020’ संबंधीचे निवेदन देण्यात आले.

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या नुकत्याच पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य निमंत्रक मा. अविनाश पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे दि. 29 डिसेंबर रोजी राज्य पातळीवर स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन द्यावे असे ठरले होते. त्याप्रमाणे विविध मान्यवरांच्या समर्थन पत्रावर सह्या घेऊन धुळे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नाटककार मा. प्रा. अनिल सोनार, भ्रष्टाचार निर्मूलनचे चंद्रवीर सावळे, अ‍ॅड. विनोद बोरसे, मधुकरभाऊ शिरसाठ, प्रा. जितेंद्र पिंगळकर, प्रा. अरुण विसपुते, दिलीप खिंवसरा, दिनेश मोरे, किरण ईशी, प्रकाश पाटील, प्रतिभा मोरे, पूनम तनेजा, प्रिया सोनवणे, व्यसनमुक्त महाराष्ट्राचे राज्य समिती सदस्य नवल ठाकरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे शाखेमार्फत पारोळा रोड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून, मुंदडा मार्केट, जमनालाल बजाज रोड, आग्रा रोड वरून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत व्यसनमुक्तीची सायकल रॅली सायंकाळी 5:00 वाजता काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करून ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा हा संदेश लोकांपर्यंत पोचावा म्हणून शाखेमार्फत गोड दुधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यसनविरोधी माहितीचे पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते व विविध महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व्यसनविरोधी घोषणा दिल्या. तसेच दारूच्या बाटलीला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. युवकांनी व नागरिकांनी 31 डिसेंबरला व्यसन करून न साजरा करता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.

यावेळी अंनिसचे ज्येष्ठ मार्गदर्शक ए.ओ. पाटील, दिलीप खिंवसरा, चंद्रवीर सावळे, दिनेश मोरे, किरण ईशी, प्रकाश पाटील, अ‍ॅड. विशाल साळवे, अ‍ॅड. उमाकांत घोडराज, पूनम तनेजा, प्रतिभा मोरे, नवल ठाकरे आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मधुकरभाऊ शिरसाठ यांचे अनमोल सहकार्य लाभले.

– नवल बी. ठाकरे, धुळे