चला, आपण गाऊ या। भूत दिसते पाहू या।
बटबटीत डोळे, दात पुढे। थयथय नाचती पाहू या।
जुनी हवेली, पडका वाडा। वेशीवर भूत पाहू या।
अंडे, लिंबू, रोट, उतारा। खरंच खातात का पाहू या।
भगत, बाबा भूत बांधती। यातील सत्य पाहू या।
भूत झपाटते, अंगात येते। कसे होते ते पाहू या।
दुबळे मन आजारी पडते। काय होते ते पाहू या।
दबले मन धीर सोडते। जाणीव हरपते पाहू या।
डॉक्टर सांगती, भूत नसते। खूणगाठ मनाशी बांधू या।
अंधारात भूत राहत असते। थाप आजीची विसरू या।
आता कळले भूत नसते। विज्ञानाची कास धरू या।
हुर्रे भुताची, हुर्रे भगताची। आपण सारे गाऊ या।
-हरिभाऊ हिंगसे
मोबा. – 9881760060