सहवेदना : अंनिस, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे यांच्या मातोश्री मंजुळाबाई भारुळे (वय वर्षे 84) यांचे नुकतेच वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. भारुळे कुटुंबियांनी मृत्यूनंतर धार्मिक कर्मकांडास फाटा दिला.
अंनिस, सांगलीचे आधारस्तंभ व मराठा समाज सांगलीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांचे वडील व्यंकटराव चव्हाण (वय वर्षे 100) यांचे नुकतेच वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर चव्हाण कुटुंबियांनी कोणतेही धार्मिक कर्मकांड न करण्याचा निर्णय घेतला.
भारुळे व चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात म.अं.नि.स. सहभागी आहे.