जळगाव येथील आशाबाबा नगरात कुर्हे पानाचे, ता.भुसावळ, जि.जळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते संजय बारी याचा पुतण्या चि.योगेश याचा विवाह पुरोगामी विचारांचे शांताराम बारी यांची कन्या दिपाली हिच्याशी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला.
सुरवातीला प्रबोधनकार व किर्तनकार प्रा. संतोष चौधरी, परतुर(जि.जालना) यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सुधाकर बडगुजर व प्रकाश बारी यांच्या हस्ते मान्यवरांना फुले यांचे शेतकर्यांचा आसूड, गुलामगिरी, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विज्ञान, विवेक व विद्यार्थी आणि जादूटोणा विरोधी कायद्याची सचित्र पुस्तिका देऊन सत्कार केला. सत्कारानंतर शिरसोली येथील रामदास नारायण बारी यांच्या साक्षीने वधुवरांनी शपथ व प्रतिज्ञा घेतली. एकमेकांच्या विचारांचा आदर करणार व समानतेच्या नात्याने वागणार अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी डॉ.अरूण बारी, प्रकाश बारी, अर्जुन बुंधे, आर.के.बारी, संजय सिनगर, प्रकाश उंबरकर, वामन पारधी, विश्वजीत चौधरी, डॉ.प्रदीप जोशी, गोकुळ वराडे, निलेश आठवाल, सुभाष अस्वार, पुना बारी, यशवंत बारी, विलास बारी, देविदास खलसे यांच्यासह सत्यशोधक संघटनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.