Categories
अभिवादन उपक्रम

मल्हार पेठ अंनिसने साजरा केला गाडगेबाबांचा स्मृतीदिन

फेब्रुवारी – २०१३

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मल्हारपेठ(ता.पाटण, जि.सातारा) यांचे वतीने 20 डिसेंबर संत गाडगेबाबा स्मृतीदिन मल्हारपेठ विभागात अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

            या प्रसंगी मल्हारपेठ शाखेचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांनी प्राथमिक शाळा, मल्हारपेठ व नर्सिंग कॉलेज, मल्हारपेठ येथे चमत्कार प्रात्यक्षिक कार्यक्रम केला. ‘संत गाडगेबाबा’ या विषयावर प्राथमिक शाळा, मल्हारपेठ येथे निबंध स्पर्धा झाल्या. स्पर्धेत तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच नर्सिंग कॉलेज, ज्ञानकरूणा इन्स्टिट्युट, मल्हारपेठ येथेही निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

            निबंध स्पर्धेत लहान व मोठ्या गटात निखील दशवंत, अनुजा माने, अमित शिंदे, श्रेटा फल्ले, श्रुती नेटके, प्राची दशवंत तसेच प्रज्ञा जमदाडे, साक्षी फल्ले, दुर्गा स्वामी, वैभवी माने, अनुराधा यादव यांनी यश संपादित केले. ज्ञानकरूणा नर्सिंग कॉलेजच्या निबंध स्पर्धेत करिश्मा पाटील, रोहिणी पवार, सौ.रेश्मा नलवडे व शितल कुलकर्णी यांनी यश प्राप्त केले. बक्षीस समारंभ मल्हारपेठ शाखेचे प्रदीपकुमार देसाई तसेच मुख्याध्यापिका सौ.जयश्री कुलकर्णी, प्राचार्यकिरण गेजगे, डॉ.प्रकाश चव्हाण यांचे हस्ते झाला.

            यावेळी सौ.सुषमा माने, सौ.तेजस्वीनी कुंभार, राजेंद्र पळशे, अनंत अघाव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. मल्हारपेठ विभागात संत गाडगेबाबा स्मृतीदिन उत्साहात संपन्न झाला.

-दादासाहेब पवार, मल्हारपेठ, जि.सातारा.