आयटक कामगार केंद्र, बिंदू चौक, कोल्हापूर कार्यालयामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्रामार्फत नितीन शंकर साळवी रा.बांदिवडे, ता.पन्हाळा व संपदा केरबा माळवी, रा.मुंबई(अंधेरी) यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावणेत आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर व अंनिसचे राज्य सचिव शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली लावणेत आला.
दोघांनी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत आयुष्यभर एकमेकांशी निष्ठेनं राहावे अशी प्रतिज्ञा वधू-वर यांना बिजली कांबळे व प्रिती बंकापुरे यांनी म्हणवून घेतली त्यानंतर उपस्थितांनी दांपत्यावर फुले टाकून आशिर्वाद दिले. यावेळी धनाजीराव जाधव, रमेश वडणगेकर, अरूण पाटील, कॉ.नामदेव गावडे, प्रकाश कांबळे, सोनल कांबळे, आर.एस.कुलकर्णी, के.डी.खुर्द, शरयू भोसले, संदीप कांबळे, सुनिल कांबळे, दिलीप पवार, कृष्णांत कोरे, प्रविण बंकापुरे, राजेंद्रप्रसाद आसबे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
–रमेश वडणगेकर, कोल्हापूर