नयना व डॉ. श्याम राऊत यांनी नवीन सदनिका नुकतीच मंचर(ता.आंबेगाव, जि.पुणे) येथे घेतली. 13 फेबु्रवारी 2011 रोजी सदनिका विद्युत रोषणाई करून सजविली. म. फुले, गाडगे महाराज यांचे फोटो घरात दर्शनी बाजूला ठेवून त्यांना नवनाथ लोंढे (अंनिस कार्यकर्ते) यांच्या हस्ते फुलांचे हार घालून सदनिकेचे उद्घाटन केले. नवनाथ लोंढे यांच्याच हस्ते जमलेल्या मित्रांना, नातेवाईकांना नारळ व अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम (डॉ. दाभोलकर व प्रा.प.रा.आर्डे लिखीत) हे पुस्तक भेट म्हणशून दिले. तर सामाजिक जाणिव म्हणून अंनिसला व मंचर येथील मतीमंद मुलांच्या हायस्कूलला प्रत्येकी 5000 रू. देणगी दिली!
– नवनाथ लोंढे, राजगुरूनगर