Categories
आवाहन हात मदतीचा

पुस्तक विक्रीतून  मदतीचे आवाहन

जून – २०११

नारायण अतिवाडकर (बेळगांव, कर्नाटक राज्य) हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील जेष्ठ आणि अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी लिहिलेल्या व अत्यंत वाचनीय असणार्‍या, अंधश्रद्धेचा बुरखा फाडणार्‍या ‘राजुच्या विज्ञान कथा’ संचाची आठवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. तसेच ‘मी ज्योतीबाची सावित्री’ नावाचे नाटक आणि इतरही पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत.

पूर्ण वेळ कार्यकर्ता असणार्‍या वयोवृद्ध मा. आतेवाडकरांना काही शारीरिक आजारांना सामोरे जावे लागले, त्यामुळे त्याची आर्थिक ओढाताणही झाली. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसने शक्यतेनुसार काही मदत केली होती. आजही त्यांना काही मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन विचारांच्या वाचक, कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन आहे की,  रोखीने त्यांच्या पुस्तकाच्या प्रती खरेदी करुन विक्रीसाठी मागवून त्यांना सहकार्य करावे.

संपर्क :

नारायण अतिवाडकर,

प्रमोद प्रकाशन, सुधा निवास, अंबेवाडी,  बेळगांव- 591108 (कर्नाटक राज्य)

भ्रमणध्वनी- 09242299810    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती