बी.आर.माडगुळकर हे निवृत्त शिक्षक आहेत. आमच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. पोवाडे अथवा अंधश्रद्धा निर्मूलनसंबंधी गाणी सहजतेने गाऊन नेहमीच शाखेच्या कार्यक्रमांत ते जान आणतात. त्यांच्या सहभागाने आमची शाखा आसपासच्या शाळांमधून विद्यार्थी वर्गाचे प्रबोधन करत असते. अशा उत्साही कार्यकर्त्याच्या कामाची पावती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अहिंसा पुरस्कार’ देऊन सन्मान केला आहे. सदर सन्मान दि.5 एप्रिल 2012 रोजी भगवान महावीर जयंतीच्या दिवशी पिंपरी-चिंचवडच्या महापौर सौ.मोहिनीताई लांडे यांच्या हस्ते देण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबरच त्यांचा संबंध एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून राष्ट्र सेवा दल व इतर परिवर्तनवादी संघटनेबरोबर आहे. त्यांनी शाळांशाळांमधून महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरूजी, लोकनायक जयप्रकाश नारायण, साथी एस.एम.जोशी, बाबा आमटे, मदर तेरेसा या व्यक्तीमत्वांवर व्याख्याने देण्याचे काम केले आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत.
–विश्वास पेंडसे