Categories
उपक्रम

भुताचा शोध घेऊन नवीन वर्षाचे अनोखे स्वागत

फेब्रुवारी – २०१४

नदीकाठी असणार्‍या स्मशानात भूतांचा वावर असतो. या समजुतीला छेद देत सांगली अंनिसच्या कार्यकर्त्यांनी 31 डिसेंबर 2013 रोजी नव वर्षाचे स्वागत मिरजेच्या कृष्णाघाटावरील स्मशानभूमीत राहून केले. या वेळी विशेष कार्यक्रमात घरादारात असणार्‍या काळ्या बाहुलीचे दहन करण्यात आले. उपस्थित असणार्‍यांत बहुसंख्य महिला होत्या. त्यांनी काळ्या बाहुल्यांच्या दहना बरोबरच चमत्काराचे दर्शनही घडविले.

रात्री 12 वाजण्याअगोदर लहान मुलींनी व मुलांनीही खिळ्याच्या पाटावर झोपून दाखविण्याचे थरारक चमत्कार प्रयोग केले. या बच्चे मंडळींनी स्मशानात अजिबात भीती वाटत नसल्याचे ठासून सांगितले.

‘भूत दाखवा 21 लाख रूपये मिळवा’ अशा पत्रिका प्रत्येक कार्यकर्त्यांने पोशाखावर लावल्या होत्या. या वेळी डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे स्मरणकथन करण्यात आले. अशा प्रकारच्या भूत शोध मोहिमा सर्वत्र राबविण्यात येणार असून, या अनोख्या नववर्ष स्वागतास कोल्हापूर, कर्नाटक येथूनही कार्यकर्ते आले होते.

या कार्यक्रमात डॉ. प्रदीप पाटील, मधुकर पवार, अभय पाटील, सुजीत काटे, राजू सर्जे, चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, उज्ज्वला परांजपे, सुनीता पाटील, मनिषा तुपलोंढे, दिशा शिंदे, किर्ती काटे, उषा आर्डे, माधुरी देशमुख, डॉ. सविता अक्कोळे, मानसी पवार, सुनिता पाटील, सुहास यरोडकर, अ‍ॅड. सुधीर गावडे, अ‍ॅड. के.डी. शिंदे, सदाशिव मगदूम, प्रा. चंद्रकांत पाटील, अजीत पाटील, सौंदर्या पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

मधुकर पवार, सांगली