Categories
मुलाखत

डॉ. डी. डी. बंदिष्टे – पूर्ण विरामाला स्थान न देणारे विवेकवादी

वार्षिकांक - २०१६

माझ्या विचार प्रक्रियेत पूर्ण विरामाला स्थान नाही, माझी मनोवृत्ती अर्धविरामी आहे. मी थांबत नाही, थबकतो, अभ्यास करतो, चिकित्सा करतो त्यामुळेच माझी विचार प्रक्रिया सातत्याने गतीशील राहिली आहे आणि मला वाटते ही वैचारिक गतिशीलता हाच विवेकवादाचा गाभा आहे. हे उद्गार आहेत गेली चाळीस वर्षे विवेकवादाचा विचार आपल्या भाषणातून, लिखाणातून, शिकवणुकीतून सार्‍या भारतभर मांडणार्‍या डॉ. डी. डी. […]

Categories
मुलाखत

विवेकवादी व्हा! – डॉ. श्रीराम लागू

वार्षिकांक - २०१५

डॉ. श्रीराम लागू. उत्कट भावाविष्कार करणारे प्रतिभावंत नटसम्राट. नाट्य अभिनयाच्या बरोबरीने विचारांच्या क्षेत्रात बुद्धिप्रामाण्यवादी मूल्यासाठी आग्रह धरणारे डॉ. लागू अपवादात्मक ठरतात. धर्म आणि देव कल्पनांची तार्किक चिकित्सा करून समाजाचा रोष ओढवून घेताना त्यांनी दाखविलेला निर्भयपणा असाधारण म्हणावा लागेल. ‘महाराष्ट्र अंनिस’ला त्यांनी दिलेले पाठबळ या चळवळीची ताकद वाढविण्यास मोलाचे ठरले आहे. अंनिसचे कार्यकर्ते टी. आर. गोराणे […]

Categories
मुलाखत

आम्ही असे बदललो..!

वार्षिकांक - २०१५

सर्वसामान्य जनता अनेक लेखक, चित्रपट कलाकार, नाट्यकलावंत (ज्याला आजच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ असे ओळखले जाते) यांना आपली मानते. त्या ‘सेलिब्रिटींचा खूपसा प्रभावही सर्वसामान्य जनतेवर असतो. त्यातले मोजकेच ‘सेलिब्रिटी’ आपल्या कलाकृतीतून, अभिनयातून, लिखाणातून केवळ ‘करमणूक’च करत असतात, असे नव्हे; तर त्याबरोबरच पुरोगामी, आधुनिक मूल्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नही करीत असतात. असे अनेक मान्यवर, लोकप्रिय कलाकार ‘अंनिस’शी प्रत्यक्ष […]

Categories
मुलाखत

‘आजच्या तरुणांना प्रश्न पडायला हवेत!’ – अभिजात जोशी

वार्षिकांक - २०१५

तुम्ही ‘लगे रहो मुन्नाभाई’, थ्री इडीएटस्’, ‘पीके’ यांसारख्या block buster चित्रपटांचे पटकथा लेखक म्हणून परिचित आहात. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तुमच्याशी एक विशेष जोडलेपण जाणवते, ते म्हणजे तुम्ही विवेकवादी विचारांचे आहात आणि विवेकवादी विचारांची ही परंपरा तुमच्या कुटुंबात चालत आलेली आहे. त्या कौटुंबिक परंपरेविषयी आम्हाला सांगा. अभिजात जोशी : माझ्या कुटुंबात पुरोगामी, उदारमतवादी वातावरण […]

Categories
मुलाखत

…परत एकदा माझा बाप मेल्यासारखे झाले! – गिरीश कुलकर्णी

वार्षिकांक - २०१५

नट, निर्माता, लेखक अशा विविध अंगाने वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस, देऊळ अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीत आपला सहभाग आहे. त्यातले काही राष्ट्रीय पुरस्काराने तसेच परदेशातील काही महोत्सवात गौरवले गेले आहेत. या आपल्या यशाबद्दल आम्ही सर्व प्रथम आपले अभिनंदन करतो. एक शिक्षक आणि ‘अंनिस’ कार्यकर्ती म्हणून आम्हाला हे जाणून घ्यायची कायम इच्छा राहिली आहे की, […]

Categories
मुलाखत

मी ‘अंनिस’चा बहिःस्थ कार्यकर्ताच आहे! – नागराज मंजुळे

वार्षिकांक - २०१५

तुमची विवेकवादी विचारांची वाटचाल आम्हाला जाणून घ्यायची आहे. तुमचं कुटुंब, बालपण, त्यावेळचं वातावरण, याविषयी आम्हाला सांगा. सगळ्या अंधश्रद्धा, अविवेकी विचार असं वातावरण असलेल्या माणसांतच मी वाढलो. म्हणजे माझं कुटुंबही तसंच होतं. म्हणजे मी ज्या जातीत जन्मलो, त्यांचे आचारविचार आणि त्यांच्या रूढी परंपरा म्हणजे वर्षाचं जर आपण बघितलं, त्यांचं एक वेळापत्रक केलं, तर त्यातले अनेक सणवार; […]

Categories
मुलाखत

गाडगेबाबांमुळे पुरता बदललो – जितेंद्र जोशी

वार्षिकांक - २०१५

आपल्या लहानपणी घरातील, आजूबाजूचे वातावरण कसे होते? सर्वसामान्य कुटुंबात असते तसेच वातावरण माझ्या घरात होते. मी माझ्या आईच्या वडिलांकडे आणि आजोबा-आजींकडे वाढलो, तर माझ्याकडे देवभोळे वातावरणच होते. माझे आजोबा पहाटे उठून भजन गात, मी त्यांच्या मांडीवर बसलेला असे. माझी आजी रोज देवळात जाई, आजही जाते. विठ्ठलाचे मंदिर, रामाचे मंदिर असे करत करत घरी यायची. मीही […]

Categories
मुलाखत

डॉ. दाभोलकर : आधुनिक भारतीय विवेकवादासाठीचा पहिला शहीद – तर्कशील सोसायटी, पंजाब

ऑक्टोबर – २०१५

‘दि. 7, 8, 9 ऑगस्ट 2015 रोजीच्या ‘विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद’ आणि अंनिसच्या रौप्यपूर्ती महोत्सवानिमित्त सोहळ्यानिमित्त हजर असणार्‍या पंजाब तर्कशील सोसायटीचे कार्यकर्तेपदाधिकारी मा. हरचंद भिंधेर आणि राजकुमार यांची अंनिवाच्या वाचकांसाठी ही खास मुलाखत. प्रश्न : पंजाब तर्कशील सोसायटीची सुरवात कशी झाली? उत्तर : साधारण सन 1984 चा काळ होता. महान विवेकवादी डॉ. अब्राहम कोवूर यांचे इंग्रजी […]

Categories
मुलाखत

धर्माला विरोध नाही, त्यातील कर्मकांडांना विरोध : भंते बुद्धप्रकाश

ऑक्टोबर – २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्यवर्षपूर्ती अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्तेत्यांच्या कुटुंबासह हजर होते. तसेच परराज्यातील विविध सामाजिक चळवळींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्यातील काही प्रतिनिधींचा अधिक परिचय, कामाचे स्वरूप, त्यांच्या चळवळींचे आणि संघटनांची ध्येय-उद्दिष्ट्ये, कामातील वेगळेपण याची जास्त माहिती आपणा सर्वांना व्हावी ह्या हेतुने अशा परराज्यातील कार्यकर्ते-प्रतिनिधींची मुलाखत घेण्याचे ठरले. बिहारमधील पटना येथून कार्यरत असणारे भंते बुद्धप्रकाश हे […]

Categories
मुलाखत

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत..

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

डॉक्टर, तुम्ही चळवळीकडे कसे आकर्षित झाला याबद्दल सांगा. एम.बी.बी.एस.साठी मी सांगलीत देवदत्तकडे होतो. त्यानंतर 1970 साली मी सातार्‍याला आलो. 1971 साली सातार्‍यात समाजवादी युवक संघटना स्थापन झाली होती. याच काळात महाराष्ट्रात समाजवादी विचारधारा जोशात होती. पार्थ पोळके, लक्ष्मण माने, किशोर बेडकीहाळ या संघटनेत सातार्‍यात सहभागी होते. गं.बा.सरदार, ज.रा.दाभोळे, नरहर कुरुंदकर, बाबा आढाव यांचे विचार मला […]