सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अॅड. चंद्रकांत शिंदे यांची आई लक्ष्मीबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी निधनानंतर कोणताही विधी न करता विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार केले. अस्थींचे विसर्जन नदीत न करता घरच्या बागेतील वृक्षाजवळ केले. 100 निराधार लोकांना भोजनपाकिटांचे वाटप केले. आईचे स्मरण म्हणून सर्व कुटुंबियांनी आईसमवेत घालविलेल्या आनंदाच्या क्षणाचे छायाचित्र प्रदर्शन भरविले. कुटुंबातील सात जणांनी देहदान करण्याचा संकल्प सोडला.
अॅड. शिंदे यांनी आपल्या कुटुंबियाशी चर्चा करून देहदानाचा संकल्प करण्याचा निश्चय केला. त्यानुसार अॅड. शिंदे, त्यांचे वडील शामराव, बंधू किशोर, पत्नी शोभा, मुलगी निशा, दिशा, पुतण्या वैभव यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन देहदानाचे अर्ज भरून दिले.