5 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
1. रक्तदान
‘अमूल्य तुमचे रक्तदान वाचविते रुग्णांचे प्राण’
1) वय 18 ते 60 वर्षांपर्यंतची किमान 45 किलो वजन असणारी कोणतेही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. 2) रक्तदात्याचे हिमोग्लोबिन साधारणत: 12.5 ग्रॅम असावे. रक्तदान करतेवेळी वेदना; तसेच नंतर अशक्तपणाही वाटत नाही. 3) दिलेले रक्त केवळ 24 तासांत आपोआप भरून निघते. तसेच निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते.
2. नेत्रदान
‘करूया मरणोत्तर नेत्रदान–जगी दुसरे सत्कर्म नसे यावीण’
1) नेत्रदान हे कोणत्याही वयाच्या व जाती-धर्माच्या; तसेच कोणत्याही रक्तगटाच्या स्त्री-पुरुषांना आपल्या मृत्यूनंतरच करता येते.
2) मोतीबिंदू, काचबिंदू व तिरळेपणा यासाठीची शस्त्रक्रिया झालेली व चष्मा लागलेली व्यक्ती देखील नेत्रदान करू शकते
3) एका नेत्रदात्याच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळू शकते.
4) मृत्यूपूर्वी संकल्प न केलेल्या मृताचेही नेत्रदान करता येते.
5) मृत्यूनंतर उन्हाळ्यात चार तासांत व हिवाळ्यात सहा तासांत नेत्रदान करण्यायोग्य असते.
6) नेत्रदानामुळे रक्तस्त्राव किंवा चेहरा विद्रुपही होत नाही.
7) देशात दीड कोटी अंधापैकी 35 लाख अंध व्यक्ती बुबुळाच्या (कॉर्नियाच्या) विकृतीमुळे अंध आहेत; यातील 26 टक्के मुले आहेत.
3. देहदान
‘मानवी मृतदेह येतो मानवाच्या कामी –जाळून पुरून नष्ट करणे राष्ट्रीय आणि हानी’
1) देहदानामुळे पाणी, हवा व जमिनीचे प्रदूषण आणि वृक्षतोड; तसेच मरणोत्तर रूढी, अंधश्रद्धा कमी होण्यास मदत होईल.
2) मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर दहा ते बारा तासांत दिला पाहिजे. दरवर्षी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 25 ते 35 मृतदेह शवविच्छेदनासाठी लागतात.
3) शवाच्या विच्छेदनाद्वारे मिळणारे ज्ञान व अनुभवाचा उपयोग, रोगाचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया यासाठी होतो. तसेच संशोधनात्मक व शास्त्रीय माहिती मिळण्यासाठी होतो.
4. अवयवदान
मेंदू झाला जयाचा मृत– नाहीच होणार पुन्हा जीवित
1) अवयवदान दोन प्रकारे करता येते.
अ) जिवंतपणीचे अवयवदान (लाईव्ह डोनेशन)
ब) मृत्यूपश्चात अवयवदान (कडेवर ट्रान्सप्लांट)
2) भारतात दर वर्षी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो; परंतु वर्षाकाठी केवळ एक हजार मृतांचे अवयवदान केले जाते.
3) भारतात प्रतिवर्षी पाच रुग्णांचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो. देशात अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येत मेंदूस्तंभ मृत (ब्रेन डेथ) व्यक्तीची दोन बुबुळे, दोन मूत्रपिंडे, हृदय, यकृत, स्वादुपिंड, त्वचा, अस्थिमज्जा, जठर, लहान आतडे इत्यादी अवयवदान करता येतात.
5) नैसर्गिक अपघाती मृत्यू; तसेच मेंदू स्तंभ (ब्रेन डेथ) व्यक्तीचे त्वचादान करून गंभीर स्वरुपाच्या जळीत रुग्णांना त्वचारोपणाने (होमोक्राफ्टिंग) वाचविता येणे शक्य आहे.
6) भारतात जळणार्यांची संख्या सात लाखांच्यावर असून त्यांना त्वचादानातून जगविता येणे शक्य आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत त्वचादान व्हावी; परंतु 24 तासापर्यंत ही त्वचा स्वीकारली जाते. मृतदेहास कुठलीही विकृती न करता तीस मिनिटांच्या आत स्कीन बँकेची टीम घरी येऊन त्वचा शिकारते.
‘दान केलेल्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण म्हणजे रुग्णास तुम्ही दिलेले जीवनदान’ फलकाच्या खालच्या भागावर स्पष्ट सूचना लिहिली आहे.
सूचना
मरणोत्तर नेत्रदान, देहदान, अवयवदानाबाबत अधिक माहितीसाठी व संकल्पपत्र भरण्यासाठी इच्छुकांना खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येईल.
संजय शेंडे – 9423101718, जगजित सिंग – 7798827868, मधुकर धंदरे-9890159912, चंद्रकांत श्रीखंडे-9518713523, सुशील मेश्राम-9860322385, अशोक खोरगडे-9423636734, गौरव आळणे – 8600145219