Categories
निषेध

डॉक्टरांचा खून तपास दिरंगाईचा महाराष्ट्रभर तीव्र निषेध

सप्टेंबर - २०१५


मोर्चा, धरणे, रॅली, मॉर्निंग वॉक आणि राष्ट्रपतींना पत्रे लिहून महाराष्ट्राने केला निषेध!

सातारा : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षेपूर्ण होऊनही मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही किंवा तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही. तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्याही खुनाला सहा महिने होऊनही तपासाची गती शून्य आहे. चळवळीतील दोन मोठे आधारस्तंभ गमावूनही संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातूनही कार्यकर्तेही चळवळ जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. देशामध्ये धर्मांध शक्ती आपले पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी क्रांतीच्या विचारांची गरज असणार्‍या माणसांचे एकत्र येणे धर्मांदांना पटत नाही. कोणत्याही विरोधाला न जुमानता परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. झालेल्या नुकसानीची सल मनात ठेऊन व मारेकर्‍यांच्या तपासासाठी सर्वतोपरी सहकार्य करायचे ठरवून शांततेच्या मार्गाने या घटनेचा वारंवार निषेध करत आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा तसेच शहरातील सर्व परिवर्तनवादी संघटना, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व सामान्य नागरीक या सर्वांनी मिळून खुन्यांचा तपास लवकर लागवा यासाठी तसेच या घटनेचा निषेध म्हणून विवेकाच्या मार्गाने शहरातून निषेध फेरी काढली व मा. जिल्हाधिकार्‍यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. या फेरीमध्ये धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, महिला महाविद्यालय, जिजामाता अध्यापिका विद्यालय, लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, कला-वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय या महाविद्यालयांतील तरूण-तरूणी, प्राध्यापक-प्राध्यापिका, प्रा. पुरूषोत्तम शेठ, तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षा यांनी पाठींबा दिला व यासह सुमारे 1000 जण फेरीमध्ये सहभागी झाले होते. फेरीच्या शेवटी डॉ. शैला दाभोलकर, किशोर बेडकिहाळ, डॉ. अनिमेष चव्हाण, विजय मांडके, कॉ. वसंतराव नलावडे या मान्यवरांनी या घटनेचा निषेध करून तपास यंत्रणा गतीमान करण्यासाठी आवाहन केले. अमर रहे अमर रहे-शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, लढेंगे-जितेंगे, फुले शाहू आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर, आम्ही सारे-पानसरे, हल्लेखोरांनो हाय हाय- विवेकाचा आवाज संपणार नाय अशा घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेले.

–श्रीनिवास जांभळे


बीड : बीड शाखेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर के कातिलोंको कब पकडा जायेचा? या मजकुराचे 300 पोस्टकार्ड मा. राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.

‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ मॉर्निंग वॉक दि. 19/08/15 रोजी सकाळी 6 ते 7 दरम्यान घेण्यात आला. बीड शहरातून नगर नाका-शिवाजी पुतळा-कारंजा-बलभीम चौक-माळीवेस-महात्मा फुले पुतळा येथे समारोप. विविध समविचारी संस्था, संघटना यांच्यासह या वॉकमध्ये 70 लोक सहभागी झाले होते. विविध फलक गळ्यात घालून डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या खुनाचा निषेध व तपासाबाबतचे फलक सर्वांनी घेऊन मॉर्निंग वॉक केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बीड आणि समविचारी संघटना यांनी ‘निषेध मोर्चा’ काढला. यावेळी सुनील क्षीरसागर, विजय घेवारे, मधुकर जावळे, राजकुमार कदम, ज्योतिराम हारकुडे, मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. नवनाथ नाईकवाडे यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये एस. एफ. आय. , ए. आय. एस. एफ. , संभाजी ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, सी. पी. आय. , सी. पी. एम. , मराठवाडा शिक्षक संघ, समता प्रतिष्ठान आदी इतर संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

–विजय घेवारे


नवी मुंबई : नवी मुंबई शाखेच्या वतीने राजू देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली “निर्भय वॉक” सी शोर, वाशी या ठिकाणी आयोजित केला होता. सकाळी 6. 30 ते 8 या वेळेत आम्ही तेथे पत्रे लिहून घेतली तसेच निषेधाची पत्रके वाटली. नवी मुंबई शाखेचे 12 कार्यकर्ते हजर होते.

संध्याकाळी 5. 30 वाजता वाशी रेल्वे स्टेशन येथे सुद्धा पत्रे लिहून घेतली व पत्रके वाटली. दिवसभरात जवळपास 150 पत्रे पूर्ण झाली तसेच बाकी पत्रे कार्यकर्त्यांनी स्वत: आपल्या मित्र परिवारांकडून भरून भरून घेतली अशी एकूण 500 पत्रे पूर्ण केली. वाशी स्टेशन येथील कार्यक्रमात पनवेल शाखेचे कार्यकर्ते सामील झाले. एकूण 22 कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. लोक उत्साहात पत्रे लिहित होते. तसेच अनेकांनी चळवळीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली(विशेषत: तरूणांनी) शेवटी अभिवादन गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

–तुषार शिंदे


मुंबई : सद्भक्ती मंदिर सोसायटी रोड बस स्टॉप ते जोगेश्वरी ते ट्रोमा हॉस्पिटल वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे निर्भय मॉर्निंग वॉक काढली. गोरेगाव व जोगेश्वरी शाखेचे महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्तेतसेच उमंग, प्रेरणा, लक्ष्य, नवविचार आंदोलन व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेसहभागी होते. 6 पोलिसांसहीत एकूण 45 जणांचा सहभाग होता. यावेळी 147 पत्रे लिहून घेतली. तसेच दादर शाखेने शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक काढला. येथे महाराष्ट्र अंनिस, दादर व वरळी शाखेचे 30 च्या आसपास कार्यकर्तेसहभागी होते. नागरिकांकडून जवळपास 100 पत्रे लिहून घेतली.

त्यानंतर जनशक्ती पार्टीच्या जनशक्ती रेल्वे कुली युनियनतर्फे सुद्धा पत्रांची मोहीम राबवली गेली. त्यावेळी जनशक्ती रेल्वे कुली युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शाहू साबळेजी आणि महासचिव मा. नितीन झेंडे(ऑल इंडिया मध्य एवं पश्चिम रेल्वे) तसेच मा. महादेव कदम-अध्यक्ष मुंबई मंडल-पश्चिम रेल्वे हे उपस्थित होते. कुलींनी व रेल्वे प्रवाशांनी जवळपास 100 पत्रे लिहून घेतली.

संध्याकाळी 6 वाजता मालाड पश्चिम स्टेशनला नवविचार आंदोलन, राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने महाराष्ट्र अंनिस, नवनिर्माण विकास संस्था व समविचारी संघटनांनी दोन तासांचे निषेध धरणे ठेवले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. . . . जवळपास 100 पत्रे लिहून झाली. .

संध्याकाळी 7 वाजता वसई स्टेशनला राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने महाराष्ट्र अंनिस व इतर समविचारी संघटनांनी 2 तास धरणे केले. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 150 पत्रे लिहून झाली.

–सचिन थिटे, मुंबई.


तळोदा : मुख्यमंत्र्यांच्या नावे तळोदा तहसीलदारांना महाराष्ट्र अंनिस, लोकसंघर्ष मोर्चा तळोदा व सर्व समविचारी संघटना पक्ष, संस्थांतर्फे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अंनिसचे तळोदा शाखाध्यक्ष प्रा. एम. पी. बिर्‍हाडे, उपाध्यक्ष डॉ. किशोर समुद्रे, अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव हंसराज महाले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. ए. टी. वाघ, प्रा. गायकवाड, एल. डी. बादाडे, एस. एम. महिरे, आर. एम. पाटील, डॉ. पी. आर. बोबडे, जयश्री महाले, प्रदीप पवार, जयंतीलाल ब्राह्मणे, मयूर वाडिले, सुमित्रा वसावे, प्रा. कमलेश बेडसे, निशांत मगरे व इतर कार्यकर्तेउपस्थित होते.

–हंसराज महाले


पालघर : पालघर येथे महाराष्ट्र अंनिस, शाखा पालघर आणि पुरोगामी समविचारी संघटना तर्फे ‘निषेध मोर्चा’चे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा निघाला. या मोर्चात ‘फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, ‘लाज गेली लाज गेली महाराष्ट्राची लाज गेली’ अशा घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा अडवण्यात आला.

यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींना पोस्टकार्ड लिहून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याचा शोध कधी लागणार असा प्रश्न पत्राद्वारे विचारला. यानंतर काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना निवेदन दिले. त्यानंतर अ‍ॅडिशन एस. पी. यांनी कार्यकर्त्यांना बोलावून ‘जादूटोणा विरोधी कायदा’ संबंधी पोलीस प्राशिक्षण तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यात या कायद्याविषयी संयुक्त प्रबोधन करता येईल का अशी विचारणा केली. त्याप्रमाणे एकत्र विचार करून ‘प्रबोधन मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचा पहिला उपक्रम म्हणून विक्रमगड येथे 8 सप्टेंबर रोजी ‘अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा’ हा जाहीर कार्यक्रम होणार आहे.

अनिल करवीर, पालघर


सिन्नर : सिन्नर शहरात महात्मा फुले पुतळ्यापासून डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन रॅलीला सुरवात झाली. मुख्य वेशीतून निघालेली रॅली शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यावर रिंगण करून सामुदायिक अभिवादन गीत झाले. तेथून पुढे वावी वेशीत आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी रिंग करून गाणी व घोषणा झाल्या. शेवटी रॅली तहसील कचेरीवर गेली व मा. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये डी. एड. च्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

दाभोलकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून माध्यमिक शाळा, गुळवंच यांच्या ग्रंथालयास अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरची एक हजाराची पुस्तके भेट दिली.

–दिलीप गोसावी, सिन्नर


चंद्रपूर : चंद्रपुरातील जटपुरा गेट जवळील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ 20 ऑगस्टला धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पत्रकार किशोर पोतनवार, कॉ. रमेशचंद्र दहिवडे, अनिरूद्ध वनकर, कॉ. नामदेव कन्नाके, कॉ. वामन बुटले, राजेश पिंजरकर, रामकुमार आकापल्लीवार, अविनाश आंबेकर, बळीराज धोटे, प्रा. चिकटे, वंदन जांभुळकर, नारायण चव्हाण, सिद्धार्थ अलोणे, प्रमोद राठोड, विजय शिंदे, डॉ. संजय कोसनकर कार्यकर्तेउपस्थित होते.

तसेच ‘हिंसाके खिलाफ मानवताकी ओर’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, ऊर्जानगर, भद्रावती, वरोरा, पोंभुर्णा या शाखांच्या वतीने एकूण 1400 पोस्टकार्डेलिहून मा. राष्ट्रपतींना पाठविण्यात आली. मातोश्री सभागृह चंद्रपूर व निळकंठराव शिंदे कॉलेज भद्रावती येथे मा. राष्ट्रपतींना पोस्टकार्डे पाठविण्याचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला.

–पी. एम. जाधव, चंद्रपूर


गडहिंग्लज : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त दि. 17 ऑगस्ट 2015 रोजी गडहिंग्लज शाखेमार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत जिल्ह्यातून 55 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्या दिवसभरात विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा जागर केला गेला. या आयोजनासाठी गडहिंग्लजमधील अनेक दात्यांनी सढळ हाताने मदत केली. बक्षिसाची रक्कम या त्यांच्या मदतीतून अनुक्रमे रूपये 3000, 2000 व 1000 देण्यात आली. त्याचबरोबर करंबळी ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान चिन्हे देण्यात आली.

त्याचप्रमाणे 20 ऑगस्ट रोजी अंनिसच्या वतीने इतर परिवर्तनवादी संघटनेच्या सहाय्याने एक दिवस प्रांत कार्यालय, गडहिंग्लज समोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहीद डॉ. दाभोलकर व शहीद कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार असा जाब विचारणारे निवेदन प्रांतांना देण्यात आले. याबरोबरच रिंगणनाट्याचे तीन प्रयोग करण्यात आले. यावेळी प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. रमेश तिबीले, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. नेर्ली, प्रा. सुरेश चव्हाण, मा. करंबळकर गुरूजी, तानाजी कुरळे, प्रा. तानाजी चौगुले, प्रा. निलेश शेळके, प्रा. शशिकांत संघराज, प्रा. मासाळ, प्रा. बाळासाहेब मुल्ला उपस्थित होते.

–रमेश तिबिले, गडहिंग्लज


अलिबाग : अलिबाग येथे ठिकठिकाणी मानवी साखळी करून निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या आंदोलनाला सुरवात झाली. त्यानंतर एस. टी. स्टँड, मारूती नाका येथेही निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. शेकापच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख चित्रलेखा पाटील यांनीही तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.

–नितीनकुमार राऊत


धुळे : म. अं. नि. स. च्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या नियोजनासाठी आधीच्या आठवड्यात दोनदा सभा घेऊन परिसरातील विविध समविचारी संघटनांच्या सभासदांना मोर्चासंबंधी सविस्तर माहिती करून देण्यात आली. पहिल्या सभेसाठी म. अं. नि. स. चे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते. तसेच शाखा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बिर्‍हाडे, कार्यवाह किरण ईशी, जिल्हा कार्याध्यक्ष के. एन. साळुंखे, प्रदीप सोनवणे, रणजीत शिंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आय. जी. पाटील आदी कार्यकर्तेउपस्थित होते. अभिवादन गीतानंतर मान्यवरांची मनोगते सादर झाली. त्यात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आय. जी. पाटील, कॉ. राव, कॉ. श्रावण शिंदे, प्रा. अ. ल. कपोले, प्रा. अनिल सोनार, प्रा. रणजीत परदेशी आदींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी निषेध व्यक्त केला. विविध समविचारी संघटनांच्या पदाधिकारींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मा. जिल्हाधिकारी आण्णासाहेब मिसाळ यांना निषेधाचे तसेच खुन्यांचा तपास लवकरात लवकर देण्याचे आव्हानाचे निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी जयहिंद महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, लॉ कॉलेज आदी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 350-400 मोर्चेकरी सहभागी होते.

–दीपक बावीस्कर


साक्री : साक्री व पिंपळनेर अंनिस ता. साक्री, जि. धुळेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार अशा मागणीची 500 साक्रीकर नागरिकांनी राष्ट्रपतींना पोस्टकार्डेपाठवली. तसेच साक्रीचे तहसीलदार माणिकराव आहेर यांना निवेदन दिले. न्यू. इंग्लिश स्कूल, साक्री येथून निषेध मोर्चा काढला, यास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 150 नागरिकांनी स्वत: भेट देऊन पत्रे लिहिली. याध्ये ज्येष्ठ नागरीक, शिक्षक, महिला, युवक, पत्रकार, पुरोगामी संघटनांचे कार्यकर्तेसहभागी झाले. याप्रसंगी माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे, अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र भोसले, साक्री शाखाध्यक्ष विजय भोसले, कार्यवाह पी. झेड. कुवर, कार्याध्यक्ष प्रा. जहागिरदार साळुंके, प्राचार्य बी. एम. भामरे, प्राचार्य डॉ. एन. डी. नांद्रे, उपाध्यक्ष एल. जी. सोनवणे व अंनिसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

–पी. झेड. कुंवर, साक्री


जालना : जालना येथे अंनिसच्या वतीने अभिवादन सभा झाली. राष्ट्रपतींना 500 पत्रे पाठविली. तपासाबाबत कलेक्टरांना निवेदन दिले. यावेळी अंनिसचे प्रा. मधुकर गायकवाड, प्रा. बसवराज कोरे, विमलताई आगलावे, अ‍ॅड. रत्नपारखी, राजेंद्र साबळे, डी. एन. गिरम इ. कार्यकर्तेउपस्थित होते.


चाळीसगाव : अंनिस व राष्ट्रसेवा दल यांच्या वतीने ‘हिंसा के खिलाफ’ ही रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील महाविद्यालयातील तरूण तरूणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी चाळीसगावातील तरूणाई रस्त्यावर उतरली होती.


अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अंनिसने डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त देहदान संकल्पाचा कार्यक्रम डॉ. गरूड हॉस्पिटलमध्ये राबविला. यावेळेस कार्यकर्त्यांनी देहदानाचे फॉर्म भरून दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. रंजना गवांदे, डॉ. प्रकाश गरूड, संजय जोशी, प्रमोेद भरूले, विनायक सापा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. संगमनेर, रहाता, पारनेर, राहुरी, अकोला, शेवगाव, पाथर्डी इ. शाखांनी शासनास निवेदने दिली.


मुरूड : म. अं. नि. स. मुरूडच्या वतीने समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनी विविध उपक्रमाने कृतीशील आदरांजली वाहिली. मुरूड शाखेच्या कार्यकर्त्यांनी रविंद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालय-खंडाळा, जि. प. प्राथ. शाळा-वाठवडा येथे चमत्कार सादरीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवून चमत्कारामागील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून दिले. ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या अभियानांतर्गत मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘महाराष्ट्र के विज्ञान प्रसारक शहीद डॉ. दाभोलकरजी के हत्यारे कब पकडे जायेंगे? असा प्रश्न विचारणारी 910 पत्रे पाठविली. ही पत्रे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुरूड येथे नागरिकांनी लिहिले.

–रमेश माने, मुरूड.

—————————————-

सांगली : सांगली अंनिसच्या वतीने डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार अशा मागणीची 1100 पत्रे सांगलीकर नागरिकांनी राष्ट्रपतींना पाठविली. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी 11 ते 4 पर्यंत धरणे आंदोलन केले. यास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 1100 नागरिकांनी स्वत: भेट देऊन पत्रे लिहिली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार, युवक, पत्रकार, पुरोगामी संघटनांचे कार्यकर्तेसहभागी झाले. पत्रे लिहिताना लोकांच्या मनात असंतोष व्यक्त होत होता. शेवटी सांगली पोस्टातील पोस्टकार्डे संपल्यानेच पत्रे लिहिणे थांबवले. . . माणूस मारून विचार संपविता येत नाही हे सांगलीकरांनी सिद्ध केले. प. रा. आर्डे, राहुल थोरात, चंद्रकांत वंजाळे, सुहास यरोडकर, जयसिंग मोहिते, आशा धनाले, त्रिशला शहा, मुनीर मुल्ला इ. नी संयोजन केले.


तासगाव : महाराष्ट्र अंनिस, तासगाव व समविचारी पुरोगामी पक्ष, संघटना, तासगाव यांचे वतीने शिवाजी चौकात डॉ. दाभोलकरांना द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी फारूक गवंडी, सुधीर नलवडे, अमर खोत, डॉ. बाबूराव गुरव, वासुदेव गुरव, पांडुरंग जाधव, राहुल जाधव, विजय कराडे, अ‍ॅड. गजानन खुजट, अ‍ॅड. तुकाराम कुंभार, प्रा. एम. बी. पवार, योगेश पवार, रोहित साळुंखे, अंकुश थिटे, शरद शेळके, समीर कोळी इ. सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

–फारूक गवंडी, तासगाव


करमाळा : अं. नि. स. शाखा करमाळा यांच्या वतीने नायब तहसीलदार दत्तात्रय लोंढे यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन गायकवाड, विजय घोलप, अमोल यादव, अर्जुन गोड, दिगंबर साळुंके, बाळासाहेब नरारे, आनंदीताई पाटील, स्वाती अनिल माने, अरूण जगताप, श्रीराम सोरटे, अतुल फंड, बापू चांदगुडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्तेउपस्थित होते.


जेऊर : जेऊर(ता. करमाळा) येथे निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्तेव भारत महाविद्यालयाचे विद्यार्थी-शिक्षक सहभागी झाले होते. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येबाबत सर्व जेऊर परिसरातील नागरिकांकडून देखील निषेध करण्यात आला. प्रा. संजय चौधरी यांनी रॅलीचे नियोजन केले. यावेळी अंनिस जिल्हा सचिव व्ही. आर. गायकवाड, अनिल माने, शाखा कार्याध्यक्ष अमोल डुंबरे, निलेश शिंदे, सुहास ठोंबरे, अक्षय कुलकर्णी, अकीब मोमीन आदी उपस्थित होते.


औरंगाबाद : महाराष्ट्र अंनिस आणि इतर समविचारी संस्थांच्या वतीने पैठण गेट औरंगाबाद येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी “हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ अभिवादन रॅली शहाजी भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. ही रॅली गुलमंडी चौक मार्गाने औरंगपुरा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात येऊन तेथे समारोप करण्यात आला. त्यावेळी प्रा. दिनकर बोरीकर, सुभाष लोमटे, डॉ. रश्मी बोरीकर, कॉ. राम बाहेती, कॉ. भगवान भोजने, मनिषा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोनालिका नागभिडे यांनी केले तर आभार बुद्धप्रिय कबीर यांनी मानले.

या रॉलीमध्ये शारदा मंदिर विद्यालय, आ. कृ. वाघमारे प्रशाला, सरस्वती भुवन हायस्कूल व महाविद्यालय, शिशु विहार प्रशाला, विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय आणि ए. आय. एस. एफ. आणि एस. एफ. आय. चे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच प्रा. डॉ. अजित खोजरे, डॉ. शाम महाजन, अभय निकाळजे, अ‍ॅड. मनोहर टाकसाळ, डॉ. शुभांगी पाळवदे, डॉ. प्रशांत पाळवदे, अ‍ॅड. संघपाल भाळसाखरे, के. ई. हरिदास, सुलभा खंदारे, अण्णा खंदारे, एम. एच. देसरडा, योगेश खोसरे, दादासाहेब शिंदे, अविनाश सूर्यवंशी आदींचा सहभाग होता.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नावे खुनाचा तपास जलद गतीने लावण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी रविंद्र राजपूत यांना निवेदन देण्यात आले. त्या शिष्टमंडळात अतुल बडवे, सोनालिका नागभिडे, अ‍ॅड. अंजली कापसे, गणेश लोखंडे, सुनील चोतमल, मजहर पटेल, प्रवीण भालेराव, अशोक निर्मल, संजय बोर्डे, अमित ससाणे आदींचा सहभाग होता.

–शहाजी भोसले, औरंगाबाद


नागपूर : म. अं. नि. स. जिल्हा शाखेतर्फे नागपुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत म. अं. नि. स. सोबत रिपब्लिकन पँथरचे मनोहर राऊत, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सहसचिव अजय शाह, भारतीय कम्युनिस्ट पार्टी(मा. ले. )तर्फे हरेन्द्र श्रीवास्तव, सत्यशोधक शिक्षक परिषदेतर्फे रमेश बिजेकर, इंडियन नॅशनल सोशल फोरमतर्फे जम्मु आनंद व किरण ठाकरे, भारतीय बहुजन महासंघाचे मिलिंद पखाले, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे गोविंद वरवाडे, फॉरवर्ड ब्लॉकचे अरून बनकर, बुद्धिस्ट रिव्हुलिशनरी फ्रंटचे जिंदा भगत, विदर्भ तेली समाज महासंघाचे संजय नरखडेकर व अनुज हुलके, धर्मनिरपेक्ष महिला फोरमच्या उज्ज्वला तुपसुंदरे, मुस्लिम महिला मंचच्या रूबिना पटेल, सोशॅलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाचे माधव बोंडे, ऑल इंडिया डेमॉक्रेटीक युथ ऑर्गनायझेशनचे शैलेश जनबंधू, आंबेडकरी प्रबोधन मंचचे अनिल बोरकर, संयुक्त महिला समितीच्या आशु सक्सेना, शिक्षा बचाव समितीचे राजेंद्र गंगोत्री आणि ए. के. घोष, समान शिक्षण मुलभूत अधिकार समितीचे विजय बाभुळकर, सोनार सेवा महासंघाचे विवेक सपकाळ, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट ‘कोर्ट’चे नायक विरा साथीदार, तसेच महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष विजय सालंकार, जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय शेंडे, कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, प्रधान सचिव विनोद उलिपवार, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील भगत, कार्यकारीणी सदस्य अशोक खोरगडे, नाना आगाशे, मौदा शाखेचे कार्याध्यक्ष गौरव आळणे, उत्तर नागपूर शाखेचे अध्यक्ष रामभाऊ डोंगरे, कार्याध्यक्ष दिपक गजभिये यांनी या अत्याचार विरोधी बाईक-स्कुटर रॅलीत जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांसह सहभाग घेऊन लोकशाही व सांविधानिक पद्धतीने, हातात निषेध व्यक्त करणारे फलक झळकवून आणि जोरजोरात घोषणांची गर्जना करून आणि तीव्र रोष व्यक्त करून, महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या गलथान राज्यकारभारांचा व जनभावनेची दखल न घेण्याच्या धोरणांचा धिक्कार नोंदवून, न्याय मागणीसाठी पुढाकार घेण्याचे सामुहिक आवाहन राज्यकर्त्यांना करण्यात आलेले आहे. संविधान चौक येथे रॅलीची सांगता सभा झाली. यानंतर एक प्रतिनिधी मंडळ मा. जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन सादर करण्यासाठी रवाना झाले. निवेदन सादर करून परत आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत स्त्री-पुरूषांसहित 150 च्या वर कार्यकर्त्यांनी बाईक-स्कूटर सह भाग घेऊन उत्कृष्ट सहभाग नोंदविला.

–विनोद उलीपवार, नागपूर


कोल्हापूर जिल्हा : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दि. 17 रोजी गडहिंग्लज येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच ‘विवेकाचा आवाज बुलंद करू’ या रिंगणनाट्याचे तीन प्रयोग करण्यात आले. 20 तारखेला कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. इचलकरंजी शाखेच्या वतीने पोस्टर स्पर्धांचे आयोजनही केले गेले. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी काढण्यात आली तर शिरोळ तहसीलसमोर धरणे आंदोलनही केले गेले.

कागल येथेही डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे मारेकरी सापडत नसल्याबद्दल निषेध फेरी काढण्यात आली. कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसाठी 35 स्पर्धकांनी निबंध पाठवून सहभाग नोंदवला.

20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत 7 संघ सहभागी झाले. तसेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठीची राष्ट्रपतींना विचारणा करणारी जिल्ह्यातून एकूण 10,000 पत्रेही लिहिली. या सर्व स्पर्धा व उपक्रमांचा समारोप 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाट्याने झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ शिरगुप्पे, दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया, महापौर वैशाली डकरे व अरूंधती महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. अशा अनेक अंगांनी निषेध व जागरण करण्यात आले.

–कृष्णात कोरे, कोल्हापूर.


पनवेल : अंनिस नवीन पनवेल शाखाने ‘हिंसा के खिलाफ और मानवता के ओर’ अंतर्गत डॉ. दाभोलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवले. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले व राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात आले. बाठीया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी, शिक्षक आणि ऑटो चालक यांच्याकडून राष्ट्रपतींना डॉक्टरांच्या हत्येच्या तपासाबाबत सवाल करणारे पत्र लिहून घेण्यात आले. जादूगार पी. बी. हांडे व मंदाकिनी हांडे यांनी हा उपक्रम राबवला.

पनवेल शाखेने शहरातून मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या मोर्चामध्ये आरती नाईक, महिंद्र नाईक व पनवेल अंनिसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


चोपडा : चोपडा येथील विवेकानंद हायस्कूलपासून पहाटे 6 वाजता कारगिल चौक पर्यंत निर्भय मॉर्निंग वॉक आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार प्रमोद भामरे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र शिरसाठ, संस्थापक डॉ. विकास हरताळकर, डॉ. आयुब पिंजारी इ. नी निवेदन दिले.


अंमळनेर : राष्ट्र सेवा दल व महाराष्ट्र अंनिस शाखा अंमळनेर व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरूजी पुतळ्यापासून ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ ही विवेकी जागराची रॅली काढण्यात आली. नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


कळंब : म. अं. नि. स. च्या कळंब(जि. उस्मानाबाद) यांच्या वतीने दाभोलकर खुनाच्या तपासात गती देऊन मारेकर्‍यांचा शोध लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंनिसचे प्रा. बालाजी राऊत, प्रा. सुरेश धावारे, अ‍ॅड. शकुंतला सावळे, प्रा. ईश्वर राठोड, शरद सूर्यवंशी, अरविंद शिंदे, विक्रम मायाचरी इ. उपस्थित होते.


वाशीम : वाशीम येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन व निषेध आंदोलन करण्यात आले. निवेदनावर पी. एस. खंदारे, डॉ. रामकृष्ण कालापाड, उमेश घुगे, अ‍ॅड. पी. पी. अंभोरे, विलास भालेराव, आर. आर. वैद्य, भगवान पडघान, शाहीर धर्मानंद इंगोले, सुखदेव तायडे, बंडोपंत सोनाजी दाभाडे, माणिकराव बांगर, सौ. बेबीताई कांबळे, रामेश्वर किसन पाटोळे, अशोक लक्ष्मण आवारे, गजानन लक्ष्मण आवारे, पांडुरंग सोपान ढाले, संजय शिवाजी आवारे, पांडुरंग सोपान ढाले, विनोद काशीराम इंगळे, जनार्धन दशरथ ढाले, डॉ. मंजुश्री जांभरूणकर यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

–पी. एस. खंदारे, वाशीम


बुलढाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बुलढाणा जिल्हा दारूबंदी अभियानाच्या कार्याकर्त्यांनी निदर्शने करत धरणे दिली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्षांच्या प्रतिनिधींनी पक्षनिवेश बाजूला ठेवत एकत्र येत दाभोलकरांच्या हत्यार्‍यांना न पकडणार्‍या शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार बाबूराव पाटील, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, ना. जा. दांडगे, रामदास बारोटे, मृणालिनी सपकाळ, राजेंद्र काळे, रणजीतसिंह राजपूत, राजीव पाटीकर, प्रा. संतोष आंबेकर, संजय राठोड, अ‍ॅड. शेळके, प्रज्ञा लांजेवार, कॉ. पंजाबराव गायकवाड, गणेश निकम, मीनलताई आंबेकर, जयश्रीताई शेळके, इंदुमती लहाने, कॉ. सुधीर देशमुख, सतीश रोठे, वामनराव जाधव, हभप कैलास महाराज आढे, अ‍ॅड. बाळासाहेब भांडे, गणेश वानखेडे, डॉ. गणेश गायकवाड, सुदाम खरे, डॉ. डी. जे. खेडेकर, प्रा. अनिल रिंढे, अनुराधा जाधव, निलेश चिंचोले, इंद्रजीत रिंढे, महेंद्र बोर्डे, अनिल अंजनकर, गणेश देशमुख आदींनी विवेकाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प केला.


वाशी : डॉ. दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त वाशीत दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मिनी सीशोअर येथे निर्भय वॉक काढण्यात आला. सकाळच्या वेळी त्याठिकाणी येणार्‍यांकडून पत्रेही लिहून घेण्यात आली. तसेच दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येच्या तपासात होत असलेल्या विलंबाच्या निषेधाची पत्रके वाटण्यात आली. सुमारे तीन तास चालेल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे संध्याकाळी वाशी रेल्वे स्थानकालगत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून निषेधाची घोेषणाबाजी केली. त्यामध्ये राजीव देशपांडे, महेंद्र नाईक, प्रफुल्ल सकपाळ, आरती नाईक, रेखा देशपांडे व त्रिशिला कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रवासी नागरिकांनी देखील त्यामध्ये सहभाग घेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहिली.


शिंदखेडा : एम. एच. एस. कनिष्ठ महाविदद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्रे लिहून डॉ. दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार? असा संतप्त सवाल केला आहे. यासाठी प्रा. जी. पी. शास्त्री, प्रा. सतिश पाटील, प्रा. दीपक माळी, प्रा. गोपाल पाखले, प्रा. बी. पी. कठरे, प्रा. परेश शाह, प्रा. संदीप गिरासे, प्रा. अजय बोरदे, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. डी. ए. पवार, देवेंद्र नाईक, प्रा. पु. डी. चौधरी, प्रा. अजया माळी आदींनी प्रयत्न केले. शिंदखेडा अंनिस शाखेतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व त्यानंतर तहसीलदार गायत्री सैदाणे यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी कार्याध्यक्ष भिका पाटील व कार्यकर्तेउपस्थित होते.


मोहोळ : मोहोळ शाखेने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरजीके हत्यारोंको कब पकडा जायेगा?’ अशा आशयाची नागरिकांकडून दीड हजार पोस्टकार्ड लिहून पाठविली. तपास यंत्रणेला कसलेही गांभीर्य दिसत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकांना यात सहभागी करून घेऊन थेट राष्ट्रपतींनाच मारेकरी कधी पकडले जातील याविषयी पत्रे पाठविली.


उमरगा : डॉ. दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त अंनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था व संघटननेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा नव्वद जणांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात विहित लेखी नमुन्यात मरणोत्तर अवयवदान करण्याची लेखी अनुमती सादर केली, तर काही कार्यकर्त्यांनी देहदानाचा संकल्प केला तसेच उमरगा, मुरूम, कलदेव निंबाळा, परांडा, कसबे तडोळा येतून 11,000 पत्रे राष्ट्रपतींना लिहून पाठविली. यावेळी प्रा. अवंती सगर, अमोल पाटील, सरिता उपासे, प्रा. महेश मोटे, प्रा. शरद गायकवाड, प्रा. प्राजक्ता पाटील, शितल वाघमारे, अभिजीत साहू, हुंकार बनसोडे, प्रभाकर निपाणीकर तसेच उस्मानाबाद अंनिस शहराध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे, अ‍ॅड. राज कुलकर्णी, रविंद्र केसकर, आनंद बिराजदार उपस्थित होते.

(संकलन : राहुल थोरात)