नागपूर (कोराडी) : महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोराडी शाखेच्या वतीने देहदान, अवयवदान आवाहन फलकाचे उद्घाटन राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. मनोगतात बोलताना पाटील यांनी सांगितले की, स्मशानभूमीत कोराडी शाखेच्या वतीने घेतलेला हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पहिला आहे व सर्व 347 शाखांना स्मशानभूमीत देहदान, अवयवदानाचा संदेश व प्रेरणा देणारा आहे. याप्रसंगी सर्वच उपस्थितांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, महादुला नगरपंचायतचे उपाध्यक्ष राजेश रंगारी, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, जिल्हा प्रधान सचिव गौरव आळणे, शाखाध्यक्ष बबनराव द्रवेकर, कार्याध्यक्ष बबनराव गायकवाड, प्रा. मिलिंद काळे, प्रा. लोडमसर, पायल झलके, दयानंद कांबळे, विष्णू आंभोरे, जितेंद्र पाढेन, उमेश तायडे इत्यादी कोराडी शाखा महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी व इतर नागरिक उपस्थित होते.
Categories
नागपूर स्मशानभूमीत लागले देहदानाचे आवाहन फलक