Categories
व्यसन शाखा वार्ता

भंडारा येथे व्यसनमुक्ती अभियान

जानेवारी - २०१६

‘मअंनिस’ शाखा भंडारा जिल्हा, महिला अत्याचारविरोधी सामाजिक न्यायमंच आणि दि सम्राट सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबर 2015 रोजी गांधी चौक येथे ‘चला व्यसनाला बदनाम करूया!’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने व्यसनविरोधी पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस ठाणेदार जयवंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 31 डिसेंबर हा दिवस व्यसनमुक्ती दिन म्हणून घोषित करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या यांच्या नावाने जिल्हाधिकार्‍यामार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, प्राध्यापक नरेश आंबिलकर, नगरसेवक हिवराज उके, बळीराम साडवे, प्राचार्य विनोद मेश्राम, अशोक बागडे, अजय वासनिक, आशा गजभिये, अश्विनी भिऊगडे, त्रिवेणी वासनिक, सुजाता घोडीचोर, प्रशांत रामटेके, इत्यादीजण उपस्थित होते.

विष्णुदास लोणारे, भंडारा