Categories
अभिवादन

सहवेदना

जानेवारी - २०१५

अंनिसच्या वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे मार्गदर्शक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांचे निधन.

अग्नीबाणाच्या घन इंधनाचे निर्माते, हवामानाच्या अचूक अंदाजासाठी गोवारीकर ‘मॉडेल’ची निर्मिती करणारे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. वसंत गोवारीकर यांचे २ जानेवारी २०१५ रोजी दुःखदनिधन झाले.
डॉ. गोवारीकर हे विज्ञान क्षेत्राबरोबरच सामाजिक जाणीव असणारे विचारवंत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अंनिसच्या अनेक कार्यक्रमात ते प्रबोधन करण्यासाठी आवर्जून हजेरी लावत. वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प या अंनिसच्या प्रकल्पाचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशस्तीपत्रकावर त्यांच्या सह्या असत. बुवाबाजीबद्दल त्यांना मनस्वी चीड होती. डॉ. नरेंद्र दाभोलकरांबद्दल त्यांना आदर होताच पण त्याच्याशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र अंनिसने आपला मार्गदर्शक मित्र गमावला आहे. गोवारीकरांच्या कुटुंबाच्या दुःखात अंनिस परिवार सहभागी आहे.

इ. करंजी अंनिसचे कार्याध्यक्ष किरण होगाडे यांचे निधन

इचलकरंजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष किरण मुरलीधर होगाडे (वय ५६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्र अंनिसतर्फे किरण होगाडे यांना भावपूर्ण सलाम!

कॉम्रेड विठ्ठल सगर यांना लाल सलाम!

महाराष्ट्र अंनिसच्या उमरगा (जि. उस्मानाबाद) शाखेचे कार्यकर्ते प्रा. किरण सगर यांचे वडील कॉम्रेड विठ्ठल आण्णा सगर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. साम्यवादी चळवळीला त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करीत होते. प्राध्यापक किरण सगर व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र अंनिसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी आहेत.

संपादक