Categories
उपक्रम संविधान

पिंपरी चिंचवड शाखेत संविधान महोत्सव साजरा

एप्रिल - २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने आकुर्डी भाजी मंडई, निगडी बस स्टॉप, कृष्णानगर, बर्ड व्हॅली उद्यान, शक्ती-भक्ती चौक येथे वारंवार चालता-बोलता कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये दिडशे वर्षांपूर्वी समाजसुधारकांनी सांगितलेली विचार धारणा म.अं.नि.स. पिंपरी-चिंचवड शाखेने रूजवण्याचे काम केले. चालता-बोलता कार्यक्रमामध्ये लोकांना संविधानावर आधारीत व समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रश्न विचारले. बक्षिस रूपात समाजसुधारकांवर आधारीत व समितीने केलेल्या कार्याची पुस्तके देण्यात आली. तसेच शाळा कॉलेजातसुद्धा चालता-बोलता कार्यक्रम घेण्यात आला. महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. व लोकांनी समितीला विनंती करून वारंवार हा कार्यक्रम घेण्यास सांगितला. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखेच्या कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. यामध्ये अ‍ॅड.महाजन दांपत्य, संजय बारी, डॉ.जनार्दन मुनेश्वर, सुधीर मोरे, विश्वास पेंडसे, स्वप्निल वाळुंज, भूषण महाजन, कटारीया सर, आनंद बनसोडे, सबनीस सर, साळुंखे काका इ.सहभाग घेतला.

अ‍ॅड.मनीषा रमेश महाजन, पिंपरी चिंचवड, पुणे.