नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार व महा अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण दिनांक 10 जुलै 2018 रोजी करण्यात आले. यावेळी देहदानाचे संकल्प फॉर्मचे वितरण करण्यात आले. काहींना मंजुरी मिळाल्याचे संकल्प पत्र व ओळख पत्रे देऊन महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून महा अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार (अकोला), राज्य प्रधान सचिव माधव बावगे (लातूर), राज्य सरचिटणीस संजय शेंडे लाभले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष जगजित सिंग, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, अशोक खोरगडे, रामभाऊ डोंगरे, विनोद उलीपवार, पुष्पा बोंदाडे, भाग्यश्री तुपे, आकाश नंदेश्वर, अनिरुद्ध मेश्राम, पुनिता तुपे, स्वप्नील, शनाया, मी राम लक्ष्मण वाडीभस्मे, नलिनी शेरकुरे, नीलिमा गोबाडे, मोक्षधाम घाटाचे व्यवस्थापक शैलेश गोरे आदी उपस्थित होते.
विवेकाचा आवाज बुलंद करू या !
– राम लक्ष्मण वाडीभस्मे, नागपूर.