शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती, संगमनेर शाखेच्या वतीने विविध विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 16 सप्टेंबरला रोजी पार पडला. यावेळी महा.अंनिस अहमदनगर जिल्ह्याचे सल्लागार बाबा अरगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुवाबाजीविरुद्ध संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी […]
कॅटेगरी: चळवळ
अंनिस नवी मुंबई शाखेने दिनांक 02 सप्टेंबर 2018 रोजी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 103 च्या प्रज्योत गायकवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुलाच्या शाळेतच पारितोषिक वितरण समारंभ घ्यावा असे शाखेने ठरवले व दिनांक 25 सप्टेंबर रोजी हा समारंभ शाळा क्र. 203 ऐरोली येथे […]
नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार व महा अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण दिनांक 10 जुलै 2018 रोजी करण्यात आले. यावेळी देहदानाचे संकल्प फॉर्मचे वितरण करण्यात आले. काहींना मंजुरी मिळाल्याचे संकल्प पत्र व ओळख पत्रे देऊन महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून महा अंनिसचे […]
एन.डी. : माणसांतला माणूस –रावसाहेब कसबे 1957 साल, मी सहावी-सातवीत असेन. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. आम्ही चळवळीतील नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी जात असू. शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत इतर डाव्या पक्षाबरोबर आघाडीवर होता आणि त्यावेळेस शेकापचे एन.डी. पाटील या तरुण नेत्याचे भाषण आमच्या दृष्टीने आकर्षणाचे असायचे कारण ते ज्या प्रकारची मांडणी करायचे, इतिहास सांगायचे […]
महाराष्ट्र अंनिसचा केरळ अभ्यास दौरा
देशभरात विज्ञान प्रचार-प्रसाराचे काम करणार्या अनेक संस्था-संघटना आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक प्रश्नांवर लढणार्या आहेत. जातीच्या, धर्माच्या, देवाच्या उपासनेच्या नावाखाली होणार्या शोषणाच्या विरोधात त्या-त्या राज्यातील संघटनांच्या ताकदीप्रमाणे बदलाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवून काम करणार्या संस्था-संघटना आहेत. अशा देशातल्या संघटनांचं एक फेडरेशन करण्यात आलं आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (FIRA), ज्याचे मेंगलोर (कर्नाटक) येथील नरेंद्र नायक हे […]
फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (फिरा) या देशातील विवेकवादी, परिवर्तनवादी चळवळींचे संघटन असलेल्या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारी समितीची सभा हॉटेल एव्हॉन रुबी, दादर, मुंबई येथे रविवार दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पार पडली. ‘फिरा’ संघटनेच्या नियमावलीविषयी, प्रामुख्याने चर्चा झाली. संघटनेची बांधणी आणि मुख्यालय; तसेच अनुषंगिक बाबींविषयी सखोल चर्चा होऊन त्यासाठी […]
जो प्रशिक्षण घेईल, तोच पदाधिकारी होईल
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरात असलेल्या सर्व शाखांमधील प्रत्येक कार्यकर्ता जून 2019 पर्यंत संघटना बांधणीच्या किमान एका प्रशिक्षणातून पुढे गेलेला असेल आणि असा प्रशिक्षित कार्यकर्ताच यापुढे शाखा, जिल्हा किंवा राज्य पदाधिकारी होऊ शिकेल, असे उद्दिष्ट आपण फेब्रुवारी 2018 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या राज्य कार्यकरिणीमध्ये निश्चित केले. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या आवाहनानुसार प्रशिक्षण विभागाने पाहिलेल्या […]
मृत्युंजय अमावस्येच्या काळोख्या मध्य रात्री पनवेल जवळील काळुंद्रे गावातील स्मशानात 110 च्या वर उपस्थिती. त्यातही 8 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या आजींपर्यंत जमलेले सारे, स्मशान असतं कसं? आणि तिथं भुताचा वावर खरंच असतो काय? या उत्सुकतेपोटी आलेले होते. महाराष्ट्र अंनिसच्या पनवेल शाखेच्या वतीने 17 मार्चच्या मृत्युंजय अमावस्येच्या निमित्ताने स्मशान सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियाच्या […]
दहाव्या जागतिक नास्तिक परिषदेचे आयोजन द्रविड कळघम चेन्नई, नास्तिक केंद्र, विजयवाडा आणि रॅशनॅलिस्ट फोरम तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील पेरियार शताब्दी शैक्षणिक संकुल येथे केले होते. नास्तिकता-मानवतावादाचा आशावाद हा जुना विषय होता. उद्घाटन कार्यक्रमासाठी मान्यवर पाहुणे म्हणून गॅरी मॅकलेलँड, प्रमुख कार्यकारी अधिकारी ‘इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अँड इथिकल युनियन’ […]
गांधी समजून घेताना…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. 2 व 3 सप्टेंबर 2017 रोजी आचार्य दादा धर्माधिकारी सभागृह, सेवाग्राम, ता. जि. वर्धा येथे आयोजन करण्यात आले होते. या […]