महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळासमोर गुटखाबंदीचा प्रस्ताव आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील आणि सर्व व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र मंत्रीमंडळाचे अभिनंदन करीत आहेत. गुटख्यामध्ये टार, निकोटीन, मॅग्नेशिअम हे घातक पदार्थ असतात. तोंडात ज्या ठिकाणी गुटखा ठेवतात, तेथे ओरल सबम्युकस फायब्रोसिस हा तोंडाचा कर्करोग(कॅन्सर) होतो. तो भाग कापून काढण्याचा सल्ला कॅन्सररोग तज्ञ डॉक्टर देतात. याचा खर्च काही (1 ते 3 लाख) लाखांमध्ये आहे. कोणतेही व्यसन हे मूलत: विकास आणि विवेकविरोधी आहे. व्यसन पदार्थाच्या सेवनातून माणसाचा विवेक नष्ट होतो. व्यसनामुळे बुद्धी, श्रम, वेळ-पैसा याकडे दुर्लक्ष होऊन व्यक्तीची बरबादी होत. आंबेडकर चौक, तुळजापूर येथे गुटख्याची होळी करण्यात आली. त्यावेळी व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते चंद्रकांत उळेकर गुरूजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्याचे जीवन प्रचंड धकाधकीचे आणि अनिश्चिततेचे आहे. यशापयश, मानहानी, अन्यायकारक वागणूक, अगतिकता, प्रचंड महत्वाकांक्षा, उदासिनता इत्यादी समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. अशा वेळी दुबळी मानसिकता असणारी मंडळी व्यसनाचा आधार घेऊन मला खूप समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणून दारू-गुटखा, मटका अशा व्यसनांच्या नादी लागतात, रसातळाला जातात. शासनाचा 100 कोटींचा महसूल बुडतो पण त्याहून अधिक खर्च व्यसनी व्यक्तीच्या खिशातून होतो. त्याशिवाय उपचारासाठी त्याहून अधिक खर्च होतो. गुटखा विक्रीच्या महसूलातून यापुढे राज्याचा विकास अवलंबून राहणार नाही असा निर्णय महाराष्ट्र शासनाला घ्यायला लावायला हवा. गुटखाबंदीचा निर्णय हा फुसका बार ठरू नये ही अपेक्षा. त्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज शहाणे, गिरीश लोहारेकर, बापूसाहेब नाईकवाडी, बालाजी टोले, अजय साळुंके, प्रा.विवेक कोरे, गणेश चादरे, शांताराम पेंदे, संतोष कानडे, आनंद जोशी यांनी विशेष प्रयत्न केले.
-चंद्रकांत उळेकर, तुळजापूर, जि.उस्मानाबाद.