Categories
खगोल वृत्त

शुक्राचे अधिक्रमण पाहण्यासाठी गर्दी

जुलै - २०१२

शुक्राचे अधिक्रमण शेकडो खगोलप्रेमी नागरिकांनी बुधवारी(ता.6 जून 2012) पाहिले. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये शुक्र आल्याचा खगोलीय अविष्कार पाहण्यासाठी बुधवारी सकाळी साडेसहापासून नागरिकांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या मैदानावर गर्दी केली होती. बसवंतवाडी(ता.तुळजापूर) येथील खगोलप्रेमी शिक्षक चंद्रकांत उळेकर यांनी सांगितले, की खगोल अभ्यासक प्रा.नितीन शिंदे(इस्लामपूर, जि.सांगली) यांनी शुक्राचे संक्रमण याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे येथील बैठकीत शुक्राचे अधिक्रमण या विषयावर एक सीडी प्रकल्पावर माहिती दिली होती. येथे सौरचष्मे राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. या सौर चष्म्यातून शुक्राचे अधिक्रमण खगोलप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांना सकाळी साडेदहा पर्यंत दाखविण्याचे काम करण्यात आले. योगिता सतीश हुंडेकरी, अपूर्वा सतीश हुंडेकरी, रोहित पांडागळे, आदेश पांडेगळे, सागर साळवे, स्वप्नील प्रकाश साळवी, वैष्णवी नागनाथ उळेकर, प्रीती चंद्रकांत उळेकर, कीर्ती उळेकर, तसेच डॉ.नरसिंग मलबा, डॉ.आबासाहेब कदम, प्रदीप हंगरगेकर, क्रीडा प्रशिक्षक राहुल जाधव, प्रकाश साळवी, सतीश हुंडेकरी यांनी ही वैज्ञानिक घटना पाहिली.