महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डिसेंबर-2011 अखेरपर्यंत राज्यातील सर्व तालुक्यातून पोचायचे ठरविले आहे. त्यासाठी आम्ही वार्तापत्राच्या वाचकांसह सर्व हितचिंतक, कार्यकर्ते व समविचारींकडून सहकार्याची अपेक्षा बाळगुन आहोत. आपला राज्याच्या ज्या तालुक्यात रहिवास आहे, त्या तालुक्यात महाराष्ट्र अंनिसची शाखा नसल्यास कृपया आम्हाला संपर्क करावा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे शाखा म्हणून संघटीत रुपात काम करणार्या नवीन इच्छुकांची आणि मददगार ठरु शकणार्या समविचारी मित्रांची नावे व संपर्क जरुर कळवावीत. आमचा प्रयत्न राहील की, आपण दिलेल्या संपर्काच्या माध्यमून आम्ही उशिरात उशिरा वर्ष अखेरपर्यंत आपल्या तालुक्यात ‘संघटना शाखा विस्ताराचे अभियान’ घेऊन जाऊ.
आपल्या तालुक्यातील प्रमुख महाविद्यालये, शाळांमधून व जाहीर स्वरुपात बुवाबाजी चमत्कार सादरीकरणाची व्याख्याने सलगपणे आयोजित करण्यात येतील, जेणेकरुन वातावरण निर्मिती होईल. त्यातून नवीन इच्छुकांची नोंदणी करण्यात येईल. अशा नवीन इच्छुकांसाठी सुरुवातीला ‘एक दिवसाची प्राथमिक कार्यशाळा’ घेण्यात येईल. त्यानंतर त्या तालुक्यात शाखा स्थापनेची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. प्राधान्याने तालुक्याच्या शहरात व तालुक्यातील मोठ्या गावांमधून देखिल शाखा स्थापनेच्या आमचा प्रयत्न असणार आहे.
समाजातील कर्तव्यदक्ष, जाणकार व सुबुद्ध नागरिकांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्यास यथाशक्ती सहकार्य व सहभाग मिहावे असे विनम्र आवाहन आम्ही करीत आहोत. कारण माणूस बदलतो आणि समाज देखील विचाराचे आधारे बदलता येतो यावर दृढ विश्वास ठेवणारे आपण विवेकी माणसे आहोत.
आम्ही आपल्या संपर्काचे, सूचनांचे व सहकार्याचे सहर्ष स्वागत करायला इच्छूक आहोत. धन्यवाद!
अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष) मो. 9422790610 avinashpatilmans@gmail.com सुशिला मुंडे (राज्य सचिव) मो. 9870730368 sushilamunde1@gmail.com मिलींद देशमुख (राज्य सचिव) मो. 9850845808 milind.guiness@gmail.com