महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा वर्धा व किसान अधिकार अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चेतना एज्युकेशन सोसायटी, सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसायटी यांच्या आर्थिक सहाय्याने 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान संविधान महोत्सव साजरा केला.
समुद्रपूर येथील विद्या विकास महाविद्यालय येथे उपस्थित 3600 मुलां-मुलींना संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. प्राचार्य बोराटे यांनी यात्रेचे स्वागत केले. या प्रसंगी अविनाश काकडे, आणि गजेंद्र सुरकार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकाची विक्री करण्यात आली. हिंगणघाट या तालुक्यातील बीडकर महाविद्यालय येथे 400 च्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य बेले, कार्यकर्तेमनोहर ढगे, भूषण पिसे उपस्थित होते.
पुढे विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात आणि देवळी येथील नगर परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दि.24 जानेवारी रोजी आर्वि येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात व तळेगाव या आष्टी तालुक्यातील पॉलिटेक्नीक कॉलेज व अध्यापक महाविद्यालयात मार्गदर्शन केले. येथे या वेळी सामाजिक कार्यकर्तेविशाल चौधरी उपस्थित होते. दुपारी 4.30 वाजता आष्टी तालुक्याच्या ठिकाणी जवाहर उर्देकनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन उपस्थित 200 विद्यार्थी विद्यार्थिनींना संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. 5 वाजता कारंजा घाटगे येथील मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. दि.25 जानेवारी सकाळी 8 वाजता नवभारत अध्यापक विद्यालय येथे तर सेलू तालुक्यातील सेलू येथील दिपचंद कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 10 वाजता कार्यक्रम होऊन दुपारी 1 वाजता कनिष्ठ महाविद्यालयात समारोप करण्यात आला. या तिन्ही ठिकाणी 2000 च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. मंगेश शेंडे, दिपक बारापात्रे, श्रेया गोडे यांनी सहकार्य केले.
–गजेंद्र सुरकार, वर्धा.