आदरणीय सभासद,
20 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे आम्हास अतिशय दु:ख झाले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या दाभोलकरांनी सामाजिक कार्याला वाहून घेण्यापूर्वी वैद्यकीय व्यवसाय केला होता. त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांसाठी आपले जीवन वेचले. एक गाव-एक पाणवठा, अंधश्रद्धांच्या विरोधातील चळवळ, पाण्याच्या प्रदूषणाविरोधी चळवळ, देवापुढील प्राणीहत्या अशा विविध प्रश्नांवर कार्य केले.
अंधश्रद्धा नाहीशा करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीची’ स्थापना केली. त्यासाठी जोरदार चळवळ उभारली. त्यांनी सातार्यात व्यसनमुक्तीचे केंद्रही सुरू केले. भारतीय पातळीवरील विवेकवादी चळवळीचे ते उपाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ‘साधना’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक होते.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनामुळे भारताने एक महान सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे. आम्ही त्यांच्या निधनाबद्दल अतीव दु:ख व्यक्त करतो.
मी सर्व सभासदांना विनंती करतो की, त्यांनी जागेवर उभे राहून त्यांना आदरांजली अर्पण करावी.