Categories
ज्योतिष

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांची ऐशी तैशी!

जून – २०१४

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 25 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ’मतसंग्रामा’ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.

भाकित/अंदाजनिकालनिष्कर्ष
1 नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही चूक
2 कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजप 282चूक
3 काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही युती 334+ चूक
4 भाजपला 155 ते 165 जागा 282 जागाचूक
5 काँग्रेसला 115 ते 126 जागा44 जागा चूक
6 राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा 6 जागाचूक
7 शिवसेनेला 10 ते 12 जागा 18 जागाचूक
8 समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा 5 जागाचूक
9 बसपाला 16 ते 18 जागा 0 जागाचूक
10 महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूकचूक
11 आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही बरोबर
12 नरेंद्र मोदी वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल. बरोबर
13 वाराणसीत त्यांना ’आप’च्या अरविंद केजरीवालयांची कडवी लढत मिळेल मतातील फरक
371784
चूक
14 एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही बरोबर
15 पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे मतातील फरक यांच्यात अटीतटीची लढत मतातील फरक
315769
चूक
16 विश्वजित कदम यांची सरशी होणार चूक
17 मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील सर्व जागा युतीला चूक
18 मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणार बारणे विजयीचूक
19 शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत बरोबर
20 नितीन गडकरींना नागपूर मध्ये केवळ पाच ते दहा हजार मतांनी विजय मिळेल.मतातील फरक
284828
चूक
21 येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार वाट पाहू या
22 त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल वाट पाहू या

भाकित 21 व 22 साठी वाट पहावी लागेल. परंतु उरलेल्या 20 भाकितांपैकी केवळ 4 भाकितं बरोबर ठरल्या. वरील आकडेवारीवरून निष्कर्ष काढल्यास फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांची ऐशी तैशी झाली असेच म्हणावे लागेल.

श्री नंदकिशोर जकातदार एक पत्रकार परिषद घेऊन आपण चुकलो किंवा फलजोतिषाचे अंदाज चुकू शकतात अशी जाहीरपणे प्रांजळ कबूली देतील का?

सुज्ञास जास्त सांगणे न लगे!

सर्व आकडेवारींचा संदर्भः http://eciresults.nic.in/statewiseS13.htm?st=S13

प्रभाकर नानावटी

लेखक संपर्क : 9503334895